आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रा. सू. गवई आंबेडकरी चळवळीचे दीपस्तंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-रिपाइंचे ज्येष्ठ नेते, बिहार केरळ राज्याचे माजी राज्यपाल रा. सू. गवई यांच्या दु:खद निधनाने आंबेडकरी चळवळीला मोठा धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे यांनी दिली आहे. त्यांनी १९९८ सालच्या प्रचारसभेच्या आठवणीला त्यांनी उजाळा दिला. अकोल्यात प्रचारार्थ १९९८ मध्ये झालेल्या जाहीर सभेत देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी समाजकल्याण मंत्री मुकुल वासनिक, युवक कल्याण क्रीडामंत्री अजय माकन यांच्यासोबत मराठा नेता म्हणून श्रीकांत पिसे यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्या वेळी रा. सू. गवई यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्र आलेल्या आठवणी श्रीकांत पिसे यांनी विशद केल्या. ते म्हणाले की, रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे आंबेडकरी तसेच बहुजन चळवळीत बहुमूल्य योगदान आहे.
श्रीकांत पिसे यांची १९९८ च्या रा. सू. गवई यांच्या जाहीर सभेत व्यासपीठावर उपस्थिती होती.