आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंघम ‘सीआे’ गीता ठाकरे यांचा अतिक्रमणावर चालला ‘हातोडा’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - सांडपाण्याच्या नाल्यावर स्लॅब टाकून अतिक्रमण करणाऱ्यांना इशारा देत आज या नाल्या पूर्णपणे मोकळया करण्यात आल्या. त्यामुळे आता नाल्यामधील गाळ काढणे शक्य होणार आहे. अकोट शहरात सांडपाण्याच्या नाल्यावर स्लँब टाकून बऱ्याच दुकानदारांनी अतिक्रमण केले असल्याने या नाल्या साफ करणे शक्य होत नव्हते. साफसफाईअभावी नाल्या तुंबल्याने मुख्य मार्गावर गटार गंगा वाहत होती. या प्रकारच्या तक्रारी मुख्याधिकारी गीता ठाकरे यांच्याकडे आल्याने त्यांनी तातडीने कारवाई करत नाल्या मोकळी करण्याची मोहीम राबविली. जवाहर मार्गावरील पुरीसाथ चौकापासून ते सोनु चौकापर्यतच्या मार्गावरील सांडपाण्याच्या नाल्यावर जिथे तिथे स्लॅब कडप्पे किंवा अन्य मार्गाने नाल्या बंद करुन ज्यांनी अतिक्रमण केले होते. त्यांना अतिक्रमण करण्याचा सज्जड दम देत पुन्हा अतिक्रमण केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.जेसीबी वापरुन हे अतिक्रमण पूर्णपणे उध्वस्त करण्यात आले. 

पिशवी विक्रेत्यावर कारवाई: बंदीअसणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या विकून शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दोन होलसेल प्लास्टिक विक्रेता यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्या गोदामातून दोन ट्रॉल्या प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. स्वत: मुख्याधिकारी गीता ठाकरे त्यांच्या सहकाऱ्यांनी जवळपास ते लाख रुपयांचा प्लास्टिकच्या पिशव्यांचा माल जप्त केला. प्लास्टिकच्या पिशव्यांची साईज मोजण्यासाठी मायक्रो मीटरचा उपयोग करण्यात आला. या कारवाईने प्लास्टिक विक्रेत्यानमधे एकच धांदल उडाली. 

गणवेशधारी नगरपालिकेचे कर्मचारी: आजसकाळी ११ वाजता मुख्याधिकारी गीता ठाकरे यांनी कोणत्याच प्रकारचा पोलिस बंदोबस्त घेता मुख्य मार्गावरील नाल्यावरील अतिक्रमण काढले. मुख्याधिकारी यांच्या सोबत पोलिस वेशातील गणवेशधारी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. हे गणवेश धारी न.पा.येथील अग्नीशमन दलाचे कर्मचारी असल्याचे समजले.या गणवेशधारी कर्मचा-यांनी पोलिसांची भूमिका पार पाडत आपले कर्तव्य बजावले. काही व्यापारी नागरिकांनीसुद्धा स्वयंफुर्तीने स्वत:आपल्या दुकाना समोरील अतिक्रमण काढून शहराच्या विकासासाठी हातभार लावला. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार, असे सांगण्यात आले. 
 
प्लास्टिकच्या पिशव्यांचा उपद्रव 
नाल्या मोकळया केल्यावर सफाई कामगारांनी नाल्या साफ केल्या असता सर्वच नाल्यांमधे प्लास्टिकच्या पिशव्या फार मोठया प्रमाणात आढळून आल्या. या पिशव्यांमुळे नाल्या पूर्ण बंद तुंबल्या हेात्या. नाल्यातील पिशव्या काढण्यात आल्या. 

पालिकेस नागरिकांनी सहकार्य करावे 
गावाच्या स्वच्छतेसाठी आणि हितासाठी नागरीकांनी सांडपाण्याच्या नाल्या मोकळया ठेवाव्यात. जेणेकरुन सफाई कामगारांना त्रास होणार नाही. तसेच प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करु नये. गीताठाकरे, मुख्याधिकारी,नगपालिका,अकोट
बातम्या आणखी आहेत...