आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • General E service Center For The Service Start Night

सेवेसाठी रात्रीसुद्धा महा ई-सेवा केंद्र सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू- येथीलग्रामपंचायतच्या इमारतीमध्ये असलेले महा-ई-सेवा केंद्र शेतकऱ्यांच्या सुविधेकरिता रात्रीसुद्धा सुरू ठेवण्यात येत आहे. बोरगावसह परिसरातील मोजक्याच गावांमध्ये महा-ई-सेवा केंद्र आहेत. मात्र, बोरगाववगळता अन्य कोणत्याही गावांमध्ये ब्रॉडबँड सुविधा नसल्याने परिसरातील शेतकरी ७/ १२ नमुना करिता बोरगावातील महा-ई-सेवा केंद्रावर गर्दी करत आहेत.
पीक विमा भरण्यासाठी शासनाच्या वतीने ३१ जुलै ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. पीक विम्यासाठी ७/१२ नमुना आवश्यक आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी येथील महा-ई-सेवा केंद्रावर गर्दी करत आहेत. शेतकऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन ग्रामपंचायतच्या इमारतीमध्ये असलेले महा-ई-सेवा केंद्र रात्री उशिरापर्यंत तसेच सुटीच्या दिवशीसुद्धा सुरू ठेवून शेतकऱ्यांना ७/१२ आवश्यक कागदपत्रे भरून देण्यात येत आहेत. या सुविधेमुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शासन शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे वक्तव्य नुकतेच मुख्यमंत्र्यांनी केले हाेते. त्याअनुषंगाने महा-ई-सेवा केंद्रानेसुद्धा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी रात्रंदिवस महा-ई-सेवा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

बोरगावमंजू परिसरात पावसाने महिनाभरापासून दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. शेतकऱ्यांच्या स्थितीची जाणीव ठेवून प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा काढता आला पाहिजे, या उद्देशाने सुटीच्या दिवशी तसेच रात्री उशिरापर्यंत ७/१२ नमुना देण्याचे काम महा-ई-सेवा केंद्राच्या वतीने करण्यात येत आहे.

^ शेतकऱ्यांची अवस्था माहीत आहे. त्यामुळेच एकही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहू नये, म्हणून आम्ही रात्री उशिरापर्यंत काम करत आहोत. तसेच सुटीच्या दिवशीही सुविधा देत आहोत.'' श्रावणनवथळे, ऑपरेटर, सेवा केंद्र.

^महा-ई-सेवा केंद्राच्या वतीने रात्रीसुद्धा शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी आवश्यक असलेला ७/१२ नमुना उपलब्ध करून देण्यात येत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. या सुविधेबद्दल महा-ई-सेवा केेंद्राचे आभार मानायला हवे.'' सचिननागरे, शेतकरी बोरगावमंजू
रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांना सातबारा नमुना देण्यात येत आहे.