आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेनेरिक औषधी आहेत ३० ते ७० टक्के स्वस्त, एरिया प्रमुख आरती टाकळकर यांनी दिली माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जेनेरिक औषधे ही इतर महागड्या औषधांपेक्षा ३० ते ७० टक्के स्वस्त आहेत. त्यामुळे नागरिकांनी या औषधांचा वापर करावा. त्यासाठी गोरक्षण रोड परिसरात जेनेरिक स्वस्त औषधी सेवा सुरु केली आहे. असे प्रतिपादन जेनेरिकार्टच्या एरिया प्रमुख आरती टाकळकर यांनी केेले. त्या गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत हाेत्या. 

जेनेरिक ब्रॅन्डेड औषधांच्या किमतीत फरक दाखवताना टाकळकर म्हणाल्या की, जेनेरिक औषधी ही ब्रॅन्डेड औषधांपेक्षा ३० ते ७० टक्के किमतीने स्वस्त असतात. कारण कोणतेही नवीन औषधे तयार करणारया कंपन्याा त्या औषांचे पेटेट घेतात. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्या औषधांवरील त्यांचा अधिकार संपतो कोणतीही कंपनी ते औषध तयार करू शकते. त्यामुळे औषध अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होते. गोरक्षण परिसरातील रचना कॉम्पेक्समध्ये हे सेवाकेंद्र सुरु केले असून याचा प्रारंभ १४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत तथा आमदार गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी पत्रकार परिषदेला माजी मुख्य औषध निर्माण अधिकारी दिलीप हांडे, प्रा. मधु जाधव, केंद्र संचालक डॉ. शामकुमार हांडे उपस्थित होते.