आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमाई घरकुल योजनेचे ६०० लाभार्थी अद्यापही प्रतीक्षेतच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राज्यशासनाच्या रमाई घरकुल योजनेंतर्गत १२४ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे, तर २६८ घरकुलांचे काम प्रगतिपथावर असून, २८२ घरकुलांच्या प्रस्तावांना नुकतीच मंजुरी मिळाली आहे. या योजनेंतर्गत १२ कोटी रुपये अद्याप शिल्लक आहेत. यातून किमान ६०० लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीच्या आधी महापालिकेला ठाणे महापालिकेतील चार कोटी, ३४ कोटी रुपयांचा निधी दिला. त्यानंतर या योजनेतील घरकुलांच्या कामाने काहीअंशी वेग घेतला. दरम्यान, महापालिकेकडे असलेल्या ३८ कोटी रुपयांतून अकोट नगरपालिकेला १३ कोटी रुपये वळते करण्यात आले, तर उर्वरित रकमेतून मंजूर घरकुलांचे काम सुरू करण्यात आले.

आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील ४४ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील १२२ मंजूर घरकुलांपैकी ८० घरकुलांचे काम पूर्ण झाले असून, ४२ कामे प्रगतिपथावर आहेत. तिसऱ्या टप्प्यात मंजूर झालेल्या २२६ घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात आहे. या लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील ४० हजारांचा निधी लवकरच दिला जाणार आहे. महापालिकेकडे या योजनेतील १२ कोटी रुपये अद्याप शिल्लक आहेत. २७० चौरस फुटांच्या घरकुलासाठी दोन लाख रुपयांचा निधी दिला जातो. त्यामुळे १२ कोटी रुपयांतून किमान ६०० लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार असून, याचे सर्वेक्षण लवकरच सुरू केले जाणार आहे.

अभियंत्यांचीवानवा : राज्यशासनाने या योजनेसाठी महापालिकेला भरघोस निधी दिला. त्यामुळे या योजनेचा लाभ लवकरात लवकरच लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी लागणारी यंत्रणा महापालिकेकडे नाही. इतर कामात गुंतलेल्या अभियंत्यांनाच ही कामे करावी लागतात. परंतु, महापालिकेकडे अभियंत्यांची संख्या कमी असल्याने लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ उशिराने मिळत आहे.

असा दिला जातो निधी
लाभार्थ्यांच्याघरकुलाचे प्रकरण मंजूर झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात ४० हजार, दुसऱ्या टप्प्यात ७० हजार, तिसऱ्या टप्प्यात ७० हजार, तर चौथ्या टप्प्यात २० हजार रुपये, असे अनुदान दिले जाते.
बातम्या आणखी आहेत...