आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीची सुपीकता टिकवण्यासाठी गिरीपुष्प वरदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : गिरीपुष्पचे झाड.
अकोला - ‘गिरीपुष्प वनस्पतीचा पाला शेतात टाकल्यास पिकाला त्यापासून नत्र, स्फुरद मिळते, असे संशोधनाअंती समोर आले आहे. त्यामुळे गिरीपुष्पची झुडपे ही शेताच्या बांधावर लावल्यास त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल,’ असे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कोरडवाहू शेती संशोधन विभागाने नोंदवले आहे. पीक उगवल्यानंतर सरीमध्ये गिरीपुष्पचा पाला टाकल्यास त्यापासून जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. नत्र, स्फुरदची गरज त्यातून भागवली जाते.
हिरव्या पाल्यापासून नायट्रोजन टक्के, ०.६ ते टक्के नत्र, तर ०.४ ते ०.५ टक्के पलाशसुद्धा मिळते. हिरव्या पाल्यात ७५ टक्के पाणी असल्यानेे वाळलेल्या पाल्यातून तिप्पट नत्र, स्फुरद मिळते. गिरीपुष्पचे बी, काड्या लावता येतात. गिरीपुष्प वनस्पती ही रोगरहित आहे. शेताच्या बांधावर लावल्यास तिला जनावरे खात नाहीत. त्यामुळे कुंपणाचे काम या माध्यमातून होते. पलाश, नत्रासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्येसुद्धा गिरीपुष्पच्या पाल्यातून मिळाल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. हेक्टरी टन पाला शेतात मिसळला तर त्यापासून वर्षाकाठी २० ते २१ किलो नत्र तयार होते. १६ ते १८ किलो पलाश मिळते, असे संशोधन आहे. पाच वर्षांपासून विद्यापीठाच्या कोरडवाहू शेतीत हा प्रयोग करत असून, त्याचे परिणामही चांगले अाले आहेत.
गिरीपुष्पचे झाड.

बांधावर लावावे
गिरीपुष्प शेतीच्या सुपीकतेत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. विद्यापीठातून शेतकऱ्यांना गिरीपुष्पच्या झाडाच्या काड्या मिळतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी गिरीपुष्प बांधावर लावावेत. कोरडवाहू शेतीसाठी गिरीपुष्प वरदान आहे.'' डॉ.विजय गाभणे, सहयोगी प्राध्यापक, कोरडवाहू शेती संशोधन विभाग, डॉ. पंदेकृवि.

पाला लवकर कुजतो : गिरीपुष्प चापाला शेतात टाकल्यावर १५ ते २० दिवसांतच कुजतो. हा पाला सरीमध्ये टाकल्यानंतर डवरणी करावी. त्यामुळे पाला मातीत मिसळतो. त्याचे रासायनिक गुणधर्म दिसतात. शेतीची सुपीकता कायम राहून जमिनीचा पोत सुधारण्यास मदत करते.