आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोरगावमंजू: शेतकऱ्याच्या मुलीची विष घेऊन आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू: स्थानिक पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या दहीगाव गावंडे येथील एका २० वर्षीय युवतीचा मृतदेह अन्वी मिर्झापूर शेतशिवारात शुक्रवारी सकाळी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. 
 
रमेश सोनोने रा. अन्वी मिर्झापूर यांची शेती असून, आज ते सकाळी शेतात गेले असता त्यांना धुऱ्यावर एका युवतीचा मृतदेह दिसून आला. दरम्यान, घटनेची माहिती दिल्यावरून घटनास्थळावर पोलिस हेड कॉन्स्टेबल अरुण गावंडे यांनी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा केला असता ही युवती संगीता रघुनाथ डाबेराव असल्याचे समजले. पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठवला. सोनोने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान, सदर युवतीचा मृतदेह आढळून आल्याने घातपात की आत्महत्या अशी चर्चा होती. युवतीच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास ठाणेदार पी. के. काटेकर, हेड कॉन्स्टेबल अरुण गावंडे करत आहेत. 

मुलगी बेपत्ता झाल्याची दिली होती तक्रार 
संगीता डाबेरावने पदवीच्या पहिल्या वर्षानंतर आयटीआय केला होता. त्यानंतर ती औरंगाबाद येथील एका कंपनीमध्ये रुजू झाली होती. दरम्यान, ती घटनेच्या चार दिवसांपूर्वी गावी आली होती. त्यानंतर मैत्रीणीच्या लग्नाला जात असल्याचे सांगून ती घरून निघून गेली. मात्र, ती घरी परत आल्याने वडीलांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार गुरुवारी दिली होती. 
बातम्या आणखी आहेत...