आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्‍वे रुळ ओलांडताना रेल्‍वेच्‍या धक्‍क्‍याने युवतीचा मृत्‍यू, बहीण गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलकापुर - शेतात जात असणाऱ्या दोघा बहिणींना रेल्वे रुळ ओलडतांना रेल्वेचा धक्का लागला. या अपघातात एका बहीणीचा मृत्यू झाला,तर दुसरी गंभीर जखमी झाली. तिच्यावर उपचार सुरु आहे. ही घटना आज शुक्रवार, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी बहापुरा येथे घडली. मलकापूर शहरापासून जवळच असलेल्या ग्राम बहापुरा येथील कोमल गजानन शितोळे (वय १६) राणी सदाशिव शितोळे (वय १७) या दोघी चुलत बहिणी आज सकाळी शेतात जात होत्या.


या वेळी बहापुरा रेल्वेगेट ओलाडतांना धुक्यामुळे येणारी रेल्वे दिसल्यामुळे दोघींनाही रेल्वेची धडक लागली. या अपघातात दोघीही गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती कळताच नगराध्यक्ष हरीश रावळ, गजानन ठोसर हे घटनास्थळी पोहचले. जखमींना त्वरित डॉ.अरविंद कोलते यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले. दरम्यान कोमल शितोळे हिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिला सिटी स्कॅनसाठी बुलडाणा येथे हलवले. कोमल हिचा उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला. तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...