आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात वडिलाचा खून; मुलीसह जावयास अकोल्यात पकडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- नागपुरातील प्रतापनगर भागात वडिलाचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये भरून गोंदियाकडे निघाले असता आॅटोचालकाला संशय आल्यामुळे सुटकेस तेथेच ठेवून पसार झालेल्या मुलीसह जावयाला अकोला लोहमार्ग पोलिसांनी विदर्भ एस्प्रेसमधून सोमवारी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास पकडले. किरण विजय तिवारी असे अटक केलेल्या विवाहित मुलीचे नाव असून, तिचा पती विजय अशोक तिवारी हा बुलडाण्यातील रहिवासी आहे. 
 
एकुलती एक मुलगी किरण ही प्रतापनगरातील वडील मानसिंग कुवरसिंह शिव ( ५५) यांच्याकडे राहत होती. किरणची आई वडेसर आहे. वडिलांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून किरणने त्यांचा कायमचा काटा काढायचे ठरवले. यासाठी किरणने तिचा पती विजय तिवारी याला बुलडाण्यावरून नागपुरात बोलावून घेतले. या दोघांनी बाजारातून मोठी सुटकेस विकत घेतली.त्यानंतर या दोघांनी मानसिंग शिव याचा खून केला. मृतदेह सुटकेसमध्ये भरून सोमवारी पहाटेच्या सुमारास प्रतापनगरातील दुर्गा मंदिर चौकात पोहोचले. 

शनिवरी जोडपे सुटकेस घेऊन ऑटोरिक्षात बसल्यावर सुटकेसमधून दुर्गंधी येत असल्याने आॅटोरीक्षाचालक विनोद सोनडवले याने ऑटोरिक्षा थांबवून पोलिसांना फोन केला.पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर जोडपे सुटकेस तेथेच टाकून पसार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मोबाईलचे लोकेशन घेतले असता ते गोंदिया ते वर्धेदरम्यान दिसून आले. विदर्भ एक्स्प्रेसने ते प्रवास करीत असल्याचे निष्पन्न होताच प्रतापनगर पोलिसांनी अकोला लोहमार्गाचे ठाणेदार एस.डी वानखडे यांना माहिती देऊन आरोपीचा फोटो त्यांच्या व्हॅटअॅपवर पाठवला. विदर्भ एक्सप्रेस अकोला रेल्वेस्थानकावर पोहोचताना जनरल डब्यामधून किरण आणि तिचा पती विजय याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, प्रतापनगर पोलिस मध्यरात्रीपर्यर्त अकोल्यात आल्यानंतर लोहमार्ग पोलिस आरोपींना त्यांच्या स्वाधीन करणार आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...