आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मावसबहिणीला पळवले, वडिलांच्‍या तक्रारीवरुन मावसभावाविरुद्ध गुन्‍हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- सख्या मावशीच्या मुलीला तिच्या मावसभावानेच पळवून नेल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून मावसभावाविरुद्ध खदान पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या दोघांनाही लातूरातून ताब्यात घेतले. 
 
विराहित येथील एका १९ वर्षाच्या मावसभावाने त्याच्या मावसबहीणी सोबतच प्रेमसंबंध जुळवले. सप्टेंबर रोजी मावसभाऊ त्यांच्या मावशीच्या घरी खडकी येथील म्हाडा कॉलनी येथे आला त्याच्या मावसबहीणीला पळवून घेऊन गेला. त्यानंतर मुलीने तिच्या भावाला मी विहिरीवर असल्याचे फोन करून सांगितले मोबाइल बंद केला. त्यानंतर मुलीच्या आईवडिलांनी तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. अखेर तिच्या वडिलांनी खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मुलगी १७ वर्षाची असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुलीचे मोबाइल लोकेशन घेतले असता त्यांचे लोकेशन लातूर आले. त्यानंतर मुलाला पोलिसांनी अटक केली तर मुलीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले. तपास पोलिस उपनिरीक्षक असलम खान करीत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...