आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसखाली चेंगरल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू, बुलडाण्‍यातील बसस्थानकावर घडला अपघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलकापूर - निष्काळजीपणे बस वळवत असताना ११ वर्षीय विद्यार्थिनीचा मागील चाकाखाली चेंगरून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज 5 डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील नरवेल बसस्थानकावर घडली. दरम्यान संतप्त ग्रामस्थांनी बसच्या काच फोडल्या.

 

मलकापूर तालुक्यातील नरवेल येथील संजना गजानन लोणे वय ११ ही विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे आज सकाळी धरणगाव येथील शाळेत जाण्यासाठी नरवेल बसस्थानकावर बसची वाट पाहत उभी होती. काही वेळानंतर एम.एच. २०/ डी/ ९३७८ या क्रमांकाची एसटी बस आली. यावेळी चालकाने आपल्या ताब्यातील बस भरधाव निष्काळजीपणे वळवली असता संजना लोणे ही बसच्या चाकाखाली सापडली. यावेळी बसचे मागील चाक तिच्या अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बसच्या काच फोडल्या. तोडफोड सुरू असतानाच काही ग्रामस्थांनी बसखाली लाकडे तुराट्या टाकून बस पेटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचवेळी घटनास्थळी दाखल झालेले दसरखेड एमआयडीसी पोलिस ठाण्याचे ठाणेदार माधवराव गरुड, संजय निंबोळकर, आनंद माने मोहनसिंग राजपूत यांनी संतप्त जमावाला शांत करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी गिरीष बोबडे हे सुध्दा घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी मृतक विद्यार्थिनीचे मामा विलास धांडे यांनी दसरखेड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवून बसचालक संजय दिगंबर नारखेडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, दसरखेड एमआयडीसी पोलिस ठाण्यात मृतक विद्यार्थिनीच्या नातेवाईकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा मलकापूर आगाराच्या अधिकाऱ्यांनी १० हजाराची तत्काळ मदत दिली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे, गजानन धांडे, विश्वनाथ पुरकर बाजार समितीचे माजी उपसभापती ज्ञानदेव कोलते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...