आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेगावात होणार मुलींचे तंत्रनिकेतन, बुलडाणा जिल्ह्यात चार ठिकाणी मुलींचे वसतिगृह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेगाव - शेगाव येथे दहा कोटी रुपये खर्चून मुलींचे तंत्रनिकेतन महाविद्यालय उभारणार आहे. या महाविद्यालयात अल्पसंख्याक समाजातील ७० टक्के इतर समाजातील ३० टक्के मुली शिक्षण घेतील, तर शेगाव, मलकापूर, चिखली बुलडाणा या चार ठिकाणी मुलींची वसतिगृहे उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महसूल कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्रीएकनाथ खडसे यांनी दिली.

शेगाव येथे रविवार, २४ जानेवारीला विविध विकासकामांचे भूमिपूजन, उड्डाणपूल लोकार्पण रस्ते आणि चौकांचे नामकरण कार्यक्रमप्रसंगी खडसे बोलत होते. याप्रसंगी आमदार भाऊसाहेब फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर, नगराध्यक्षा शारदा कलोरे, उपाध्यक्षा ज्योती मुंधडा, डॉ. अंजुषा भुतडा, आशिष व्यास, विजूबाप्पू देशमुख, प्रदीप सांगळे, राजू अग्रवाल, शरद अग्रवाल, सुनीता कलोरे, जिजाबाई वपने आदींनी खडसे यांचे स्वागत केले. या वेळी खडसे म्हणाले की, सर्व समाजाला सोबत घेऊन राज्याचे हित साधण्याचा भाजप शासनाचा संकल्प असून, अल्पसंख्याकांच्या सर्वांगीण विकासाकरिता शासन कटिबद्ध आहे. विविध कामे करणाऱ्या कारागिरांना त्यांच्या स्वत:चा व्यवसाय उभा करण्यासाठी मुद्रा योजनेतून १० लाख रुपये कर्ज देणार असल्याचे सांगत शेगावात मुस्लिम समाजाच्या शादीखान्यासाठी पूर्वी ७० लाख रुपये मंजूर केले होते. त्यामध्ये ३० लाखांची वाढ केल्याची माहितीही पालकमंत्र्यांनी दिली. दरम्यान, रेल्वे उड्डाणपुलाच्या उद्घाटन सोहळ्यास खासदार प्रतापराव जाधव अनुपस्थित होते. या कार्यक्रमाचा शिवसैनिक निषेध करणार असल्याने १४ कार्यकत्यर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते.

शेगाव येथे उड्डाणपुलाच्या बांधकामाचे उद्घाटनासाठी आले असताना एका चौकाचे कोनशिलेचे अनावरण करताना ना.खडसे, आ.फुंडकर.