आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोयनका, रुंगटा यांना मिळाला अंतरिम जामीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नोकरीसाठी तरुणाचं लैंगिक शोषण करण्याचा आरोप असलेले निरंजनकुमार गोयनका आणि जुगलकिशोर रुंगटा यांनी अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. गुरुवारी न्या. प्रसन्ना वराळे यांच्या खंडपीठासमक्ष त्यांच्या याचिकेवर सुनावणी झाली असून, न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर करीत अकोला पोलिसांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी एका आठवड्याने होईल.

अकोला येथील नावाजलेल्या भारतीय सेवा सदन शिक्षण संस्थेच्या राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयात रोजंदारीवर काम करणाऱ्या तरुणाने संस्थेचे माजी अध्यक्ष निरंजनकुमार गोयनका आणि सचिव जुगलकिशोर रुंगटा यांनी आपल्यावर सात वर्षांपासून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचे स्टिंग ऑपरेशन उघड करून त्याने खळबळ उडवून दिली. ही घटना जुलै रोजी उघडकीस आली.

अकोला पोलिसांनी यात गुन्हाही नोंदवला आहे. प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून, गोयनका आणि रुंगटा यांना अटक होण्याची चिन्हे असताना त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अकोला जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती.परंतु, सत्र न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून पोलिसांना नोटीस बजावली आणि आरोपींना अंतरिम जामीन मंजूर केला.