आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकली सोने देऊन ठगाने अडीच लाखांनी फसवले, सोन्याच्या एेवजी दिले पितळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
अकोला- मालेगाव येथील एका भांड्याचा व्यवसाय करणाऱ्याला एका भामट्याने अडीच लाख रुपयांच्या मोबदल्यात दोन किलो सोने देतो, असे म्हणून गंडवले. त्याने सोन्याच्या एेवजी पितळ दिल्याचे कळल्यानंतर रामदासपेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील नारायण साबू यांना राजस्थान येथील रमेश दलपत याचा फोन आला. माझ्याकडे दोन किलो सोने आहे. ते मोडायचे आहे. तुम्ही विकून द्या, या भागात माझ्या कुणी ओळखीचे नाही, असे म्हटले. त्यानंतर साबू यांनी त्याला शास्त्री स्टेडियमजवळ येण्याचे सांगितले. ठरल्याप्रमाणे दोघेही भेटले. सोने विकून देण्यापेक्षा आपणच ते अडीच लाखात घेऊन टाकू असा विचार साबू यांचा झाला. त्यांनी दलपत याला अडीच लाख रुपये दिले दलपत निघून गेला. त्यानंतर साबू यांनी सोने दुकानात नेले असता सराफाने हे सोने नसून पितळ असल्याचे त्यांना सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर साबू यांनी रामदासपेठ पोलिसात तक्रार दिली. 
बातम्या आणखी आहेत...