आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार महिन्यांपूर्वी अडीच किलो सोने लुटणारे अजूनही गायबच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शनिवारी सकाळी ११ वाजता एअरटेल डीटीएच कंपनीची रोकड भरण्यासाठी जाणाऱ्या युवकाला चोरट्यांनी जठारपेठेत लुटले. त्याच्याजवळील लाख ५७ हजार रुपयांची पैशाची थैली चोरटे घेऊन पसार झाले.

या घटनेला दोन दिवस उलटल्यानंतरही गुन्हे शाखेच्या पोलिसांना आरोपीचा छडा लावता आला नाही. तसेच चार महिन्यांपूर्वी अडीच किलो सोने लुटणाऱ्या आरोपींपर्यंतही पोलिसांना पोहोचता आले नसल्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढत अाहे. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचे दिसून येत आहे. सराफा व्यावसायिकांनी मुंबईहून कुरिअरच्या माध्यमातून आणलेले सोने जठारपेठेत सकाळी वाजताच्या सुमारास लुटण्यात आले होते. त्याचा तपास एलसीबीकडे आला होता. मात्र, आजपर्यंत या प्रकरणातील एकही आरोपी पोलिसांच्या हाती आला नाही. त्यानंतर याच परिसरात शनिवारी दुसरी घटना घडली.

या घटनेमध्ये २४ वर्षीय युवक एअरटेल डीटीएच कंपनीच्या कार्यालयातील जमा झालेली रक्कम जठारपेठेतील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत भरण्यासाठी जात होता. या वेळी चोरट्यांनी दुचाकीच्या मागे १०-१० रुपयांच्या चार नोटा फेकल्या आणि तुझे पैसे पडले असे म्हटले. त्यावर युवकाने पैशाची थैली गाडीलाच ठेवत पैसे वेचण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, चोरटे त्याची लाख ५७ हजार रुपये असलेली पैशाची थैली घेऊन पळून गेले. रविवारी पोलिसांनी रतनलाल प्लॉट चौक ते जठारपेठ चौकदरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. पालकमंत्री गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या कार्यालयाच्या बाहेरील दिशेचे फुटेज पोलिसांनी तपासले. मात्र, सुगावा लागला नाही.