आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध: पालकमंत्री डॉ. रणजित पाटील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालकमंत्र्यांनी पोलिस परेडचे निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली. - Divya Marathi
पालकमंत्र्यांनी पोलिस परेडचे निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली.
अकोला- अकोला जिल्ह्याचा सर्वांगीण विकास डोळ्यापुढे ठेऊन आरोग्य, शिक्षण, संरक्षण , मुलभूत सोयीसुविधा याकडे विशेष लक्ष्य देण्यात येत असून, त्यासाठी संबंधित महत्वपूर्ण कामे तडीस नेण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी महाराष्ट्र दिनाच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजारोहणप्रसंगी केले. 
 
लालबहाद्दूर शास्त्री स्टेडियम येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा आदींसह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, शासकीय निमशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, खरीप हंगामात चार लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. तीन लक्ष शेतकरी खातेधारकांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजने अंतर्गत विमा काढण्याचे सरकारचे लक्ष्य आहे, तर गरीब गरजू रुग्णांची आजपासून आरोग्यपूर्व तपासणी करण्यात येणार आहे. ई-फेरफार आज्ञावलीची अंमलबजावणी सुरु करणारा अकोला जिल्हा पहिला ठरल्याचेही ते म्हणाले. यावेळी पालकमंत्र्यांनी पोलिस परेडचे निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली. त्यानंतर विविध विभागांच्या पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
 
यामध्ये जिल्हा क्रिडा गुणवंत पुरस्कार २०१६-१७ साठी प्रगती करवाडे, रजतसिंग रामसिंह, सुरेंद्र मलीये, नारायण बत्तुले, जिल्हा युवा पुरस्कार २०१५-१६ साठी नाजीया परवीन, टी.एस. खान, विमल जैन, सेवाश्री बहुउद्दीशीय संस्था खडकी, आपत्ती व्यवस्थापन शोध बचाव पथकातील कर्मचारी सुनिल कल्ले, हरिहर निमकंडे, पी.एस. दामोदर, दीपक सदाफळे, तालुका स्मार्ट ग्रामपंचायतींना यावेळी गौरवण्यात आले. तसेच पालकमंत्री यांनी यावेळी जिल्हा पोलिस दलाच्या सद््भावना मासिकाचे प्रकाशन केले. जिल्हा पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या कार्याचा गौरव केला. सुत्रसंचालन नायब तहसिलदार श्यामला खोत-पाटील यांनी केले. 
 
बातम्या आणखी आहेत...