आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Getting Support Defenseless With Orphan

अनाथ बालकांसह निराधारांना शासनाचा मिळतोय आधार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - परिस्थितीनेएकटे पडलेल्या समाजातील दुर्बल, निराधार अनाथांना महसूल विभागाच्या विशेष योजनांमार्फत अनुदान उपलब्ध करून दिले जाते. अकोला तालुक्यात दर महिन्याला सव्वा कोटी रुपये वितरित केले जातात. याशिवाय अनाथ बालकांची शोधमोहीम राबवली जात असून, अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न अकोला तहसीलमार्फत केला जात आहे.

शासनामार्फत संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, आम आदमी विमा योजना राबवली जात आहे. नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे तहसीलदार संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनात गत काही महिन्यांपासून अनाथ लाभार्थी शोधमोहीम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत १०० मुले सापडली. ही सर्व मुले
१८वर्षे वयोगटातील होती. अशा ५३ मुलांना दरमहा ६०० रुपये, दोन मुले कुटुंबात असतील तर त्यांना ९०० रुपये अनुदान दिल्या जाऊ लागले आहे. याशिवाय त्यांना जवळ पडेल अशा शाळेत त्यांचा प्रवेश करून त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिली आहे. जेणेकरून त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन होऊ शकेल. तलाठ्यामार्फत अशा मुलांचा शोध घेऊन या मुलांना सायकल वाटप करून शाळेत जाण्याची त्यांची ओढ वाढावी, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे नायब तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात योजना
- नाव - पात्रता - आर्थिक मदत
- संजय गांधी निराधार योजना - विधवा, अपंग, परित्यक्त्या, घटस्फोटित, अनाथ, दुर्धर आजार - ६०० ते ९०० रुपये
- श्रावण बाळ योजना - ६५ वर्षे - ६०० रुपये
- इंदिरा गांधी श्रावणबाळ योजना - ६० वर्षांवरील बीपीएल - ६०० रुपये
- राष्ट्रीय कुटुंब स्वास्थ्य लाभ योजना - १८ ते ५९ वर्षे - एकरकमी २० हजार रुपये
- आम आदमी विमा योजना - भूमिहीन शेतमजूर, २.५ बागायती, एकर कोरडवाहू - मृत्यू झाल्यास एकरकमी ३० हजार रुपये

फसवणूक होत असल्यास करा तक्रार
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत हा निधी पोहोचावा, यासाठी तहसील कार्यालयामार्फत प्रयत्न केले जातात. दीड वर्षांपासून कार्यालयाच्या नावावर होत असलेली दलाली थांबली आहे. अनुदान मिळवून देण्याच्या नावावर कुणी पैसे मागत असेल, त्यांनी थेट आमच्यासोबत संपर्क करावा.'' प्रतीक्षातेजनकर, नायब तहसीलदार

दुर्धर रुग्णांना मिळते शासनामार्फत मदत
एचआयव्ही,सिकलसेल, थॅलेसिमिया, कर्करोग यांसारख्या दुर्धर आजारी रुग्णांना शासनामार्फत दरमहा ६०० रुपये मदत पुरवली जाते. जर यापैकी कुणी रुग्ण असेल, तर त्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.

संजय गांधी निराधार योजना
- श्रावण बाळ योजना
- आम आदमी विमा योजना
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना