आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वोपचारचा अपघात कक्षापासून अायसीयुपर्यंतचा रस्ता जीवघेणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील अपघात कक्ष ते अतिदक्षता विभागापर्यंतच्या रस्त्यावर रुग्णाचे जीव जाण्याच्या घटना घडताहेत. कारण हा रस्ता स्ट्रेचर चालण्यायोग्य नाही. स्टेचरची चाके लहान असल्याने ते अडखळतात. परिणामी रुग्णाला लावण्यात आलेल्या ऑक्सिजनच्या नळ्या सिलिंडरपासून वेगळ्या होतात आणि रुग्णाचा गुदमरून मृत्यू होतो. मात्र, हा रस्ता दुरुस्त करण्याची गरज आजपर्यंत प्रशासनाला वाटली नाही. निदान स्टेचरपुरता तरी रस्ता बनवण्यासाठी प्रशासनाने मनावर घेण्याची गरज आहे.
सर्वोपचार रुग्णालयामध्ये अकोला, वाशीम बुलढाणा येथील अपघातातील अन् गंभीर आजाराचे शेकडो रुग्ण दररोज दाखल होतात. मोफत आणि चांगल्या उपचाराची भावना ठेऊन हे रुग्ण दाखल होत असतात. येथे सर्व सोयीसुविधा जरी असल्या तरी अंमलबजावणी करणारी यंत्रणा सेवाभावाच्या नजरेतून येथील रुग्णाशी व्यवहार ठेवत असल्यामुळे अनेकवेळा रुग्णांना त्यांचा फटका बसल्याचे दिसून येते.

सध्या रुग्णालय परिसरातील रस्ते आणि एका वार्डातून दुसऱ्या वार्डात जाण्यासाठीच्यास रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, या रस्त्यावरून रुग्णांना स्ट्रेचरवरून नेल्या जात असल्यामुळे हे रस्ते आजमितीला रुग्णाच्या जीवावर उठले आहेत. या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गंभीर अवस्थेतील रुग्ण पहिल्यांदा थेट अपघात कक्षात येतो. त्यानंतर त्याला इतरस्त वाॅर्डांमध्ये हलवण्यात येते.

त्यातही मुख्य म्हणजे अपघात कक्षातून अतिदक्षता वार्डात नेण्यात येणाऱ्या रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे काही मिनिटात हा रुग्ण या वार्डात पोहचणे आवश्यक असते. मात्र अनेकवेळा या रुग्णांला नेण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे नातेवाईकांची घालमेल होते. प्रसंगी रुग्ण दगावतो सुद्धा. याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असून, रुग्णासांठी येथील रस्ते चांगले करण्याची गरज आहे.

अपघात कक्ष शिकाऊ डॉक्टरांच्या भरवशावर : अपघातकक्षात विभाग प्रमुख २४ तास उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र या वार्डात बहुतांश वैद्यकीय अधिकारीच उपस्थित नसतात. रात्रीच्या वेळी तर येथे वैद्यकीय अधिकारी शोधूनही सापडत नाहीत. शिकाऊ डॉक्टरांच्या भरवशावर हा वार्ड सोडल्या जातो. शिकाऊ डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा लावतातही. स्वत:ला झोकून देऊन ते काम करतात. मात्र त्यांचा अनुभव अपुरा पडत असल्याने अनेकदा त्यांना कळेनासे होते. अशावेळी ते येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी फोनवरूनच संपर्क साधतात आणि डॉक्टर त्यांना सूचना देऊन मोकळे होतात. मात्र उपस्थित राहण्याची तसदी घेत नाहीत. परिणामी रोजच येथे नातेवाईकांवर हंबरडा फोडण्याची वेळ येते.

स्ट्रेचरची चाके लहान असतात. त्यासाठी गुळगुळीत रस्ते असणे आवश्यक आहे. तसे नसल्याने स्ट्रेचरची चाके अडखडतात रुग्णांना धक्के बसतात. अनेकदा रुग्णांना लावण्यात आलेला श्वासोश्वासाच्या नळ्या निघतात.

नातेवाइकच रुग्णांना नेतात स्टेचरवरून
शासकीय रुगालयात स्टेचरवरून रुग्णांना एका वार्डातून दुसऱ्या वार्डात नेण्यासाठी कर्मचारी आहेत. मात्र ते कधीही आपली ड्युटी प्रामाणिकपणे पार पाडत नाहीत. नातेवाईकच आपल्या रुग्णांची ने-आण स्ट्रेचरवरून नाइलाजाने एक्स-रे, सोनोग्राफी करण्यासाठी तसेच एका वार्डातून दुसऱ्या वार्डात करतात. त्यामुळे या रुग्णालयात कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याचेही सिद्ध हाेते.
बातम्या आणखी आहेत...