आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बकूळ सिंगापूर चेरी झाडांच्या माध्यमातून पक्ष्यांना निवारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - कुणाला कोणता छंद असावा, याचे विशिष्ट परिमाण आखून ठेवता येत नाही. परंतु, अनेकांचे छंद हे त्यांच्यापुरतेच किंवा फार तर कुटुंबापुरते हितकारक ठरतात. अपवादात्मक स्थितीतच हे छंद व्यापकरीत्या उपयोगाचे ठरतात. असाच अपवाद पंदेकृविच्या उद्यान विद्या महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंद जाधव यांच्या बाबतीत घडला आहे.
प्राचार्यपदाच्या जबाबदाऱ्या निभावतानाच डॉ. जाधव यांनी उन्हाळ्याच्या दिवसांत पक्ष्यांना निवारा मिळवून देण्याचा वसा जपला आहे. त्यासाठी आपल्या व्यस्ततेतून वेळ काढत त्यांनी विद्यापीठातील श्रमदान रस्त्याच्या दुतर्फा बकूळ सिंगापूर चेरीची झाडे लावली आहेत. या दोन्ही प्रकारच्या वनस्पतींचे वैशिष्ट्य असे की, रखरखत्या उन्हातही ही झाडे हिरवीकंच असतात. झाडे हिरवीकंच राहत असल्याने पक्ष्यांना निवारा मिळतो. शिवाय, याच झाडांच्या बुंध्यांशी पाण्याच्या कुंड्या बसवल्या असल्यामुळे पक्ष्यांना पाणीही पिता येते. विद्यापीठाच्या उद्यान उर्वरित.पान
विद्याविभागापासून कुलगुरूंचे कार्यालय असलेल्या प्रशासकीय इमारतीपर्यंतचा श्रमदान रोड सुमारे दीड किलोमीटर लांबीचा आहे. त्यामुळे पक्ष्यांसाठी हा रस्ता म्हणजे एकप्रकारची संजीवनीच ठरला आहे.

पक्ष्यांसाठी फिरती घरटीही तयार केली : निसर्गाने आपल्याला भरपूर दिले. त्यामुळे आपणही काही देणे लागतो, याचे भान सतत जपणाऱ्या डॉ. जाधव यांनी कार्ड बोर्डच्या साहाय्याने घरटीही बनवली आहे. ही घरटी घरांमधील गॅलरी किंवा इतर भागांत लटकवून ठेवता येतात. त्यात पक्ष्यांसाठी दाणा-पाणीही ठेवता येते. इतरांनीही हा उपक्रम राबवावा, असे ते आवर्जून सांगतात.

भोजन शाळा
डॉ.जाधव यांची भूतदया एवढ्यावरच थांबली नाही, तर त्यांनी पाइपचे टाकाऊ तुकडे वापरून पक्ष्यांसाठी भोजन शाळाही तयार केली आहे. पाइपच्या तुकड्यांच्या उभट भागात काही अंतरावर टपरी पत्रा टाकल्यानंतर खड्डा तयार होतो. पुढे या खड्ड्यात तांदूळ टाकले जाते. हे तांदूळ म्हणजेच भोजन शाळा हाेय.

लाेकांचाही पुढाकार
^पाइपच्या तुकड्यांपासून तयार केलेल्या भोजन शाळेची काळजी लोकांनीच घेणे सुरू केले आहे. सकाळ-संध्याकाळी विद्यापीठ परिसरात फिरायला येणारे नागरिक स्वत:च तांदुळाचे दाणे सोबत घेऊन येतात. '' डॉ. गोविंद जाधव, प्राचार्य,उद्यान विद्या महाविद्यालय, डॉ. पंदेकृवि, अकोला.

बातम्या आणखी आहेत...