आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवीधर निवडणूक: अकोला जिल्ह्यात 63.44टक्‍के मतदान, शांततेत पार पडली मतदान प्रक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- विधानपरिषदेच्या अमरावती   भाग पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. याआधीचे सर्व विक्रम मोडीत काढीत पदवीधरांनी तब्बल ६३.४४ टक्के मतदान केले. त्यामुळे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळचे मतदान २० टक्क्यांनी वाढले आहे. 

या मतदानासोबतच रिंगणात असलेल्या सर्व तेराही उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले असून आगामी फेब्रुवारीच्या मतमोजणीअंती नवा आमदार पदारुढ होणार आहे. जिल्ह्यात सकाळी १० वाजेपर्यंत फक्त ९.२४ टक्के मतदान झाले होते. मात्र नंतरच्या दोन तासांत बऱ्याच केंद्रांवर मतदानासाठी रांगेत उभे असलेले मतदार दिसून आले. त्यामुळे दुपारी वाजेपर्यंत मतदानाच्या टक्केवारीत बऱ्यापैकी वाढ नोंदवली गेली. दुपारी दोन वाजेपर्यंतच्या अाकडेवारीनुसार १४ हजार ३४६ पुरुष आणि हजार ८६८ महिला अशाप्रकारे २० हजार २१४ (४२.८७ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतरच्या दोन तासांत ही आकडेवारी तब्बल नऊ हजाराने वाढून २९ हजार ९१३ वर पोहोचली. 

खासदार  जिल्‍हाधिकारी  पोहोचले बाजोरियामध्ये: खासदार संजय धोत्रे, त्यांचे चिरंजीव अनूप सूनबाईंनी मुंगीलाल बाजोरिया हायस्कुल या मतदान केंद्रावर मतदान केले. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाही खासदार महोदयांनी गुरुवारी रात्रीच अकोला गाठले आणि सकाळी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. याच केंद्रावर जिल्‍हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनीही त्यांच्या अर्धांगीनीसह मतदान केले. 

भाजप उमेदवाराविरुद्ध अपक्ष गावंडे यांची तक्रार: अकोटयेथील एका मतदान केंद्रावर उमेदवाराच्या प्रतिनिधीच्या हातात भाजप उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांच्या नावाचे ‘वॉटर मार्क’ असलेली मतदार यादी होती. ही बाब आचारसंहितेचा भंग करणारी असल्याचे सांगत अपक्ष उमेदवार अॅड. संतोष गावंडे यांनी अमरावतीचे विभागीय उपायुक्त तथा सहनिवडणूक निर्णय अधिकारी मावस्कर, सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी जी. श्रीकांत आणि अकोटचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांच्याकडे तक्रार नोंदवली. 

शंभर टक्के नाहीच: यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रचंड धावपळ झाली. भीतीपोटी काही मतदारांनी त्यावेळच्या संभाव्य उमेदवारांच्या मतदार नोंदणी अभियानासह शासकीय यंत्रणेकडेही अर्ज भरुन दिले. परिणामी एकाच व्यक्तीचे नाव दोन केंद्रांवर दिसून आले. परंतु प्रत्यक्षात एकदाच मतदान करण्याची संधी असल्यामुळे सर्वांनी मतदान केल्यानंतरही शंभर टक्के मतदान होणे शक्य नव्हते. दरम्यान दोनदा असलेली नावे यथावकाश कमी केली जातील, असे जिल्‍हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

महिलेच्या नावावर दुसरीनेच केले मतदान: मुंगीलालबाजोरिया कॉन्व्हेंटमधिल एका मतदान केंद्रावर एका महिलेच्या नावाने दुसऱ्याच महिलने मतदान केले. मुळात या दोन्ही महिलांची नावे सारखीच होती. मधले नाव वेगळे होते. परंतु मतदान अधिकाऱ्याने मतदानास आलेल्या महिलेच्या नावावर खूण करता जी महिला मतदानाला आली नाही, तिच्याच नावावर खूण केली. त्यामुळे नंतर आलेल्या महिलेचे ‘टेंडर वोट’ नोंदवले गेले. 
 
वृद्धांनीही हिरीरीने बजावला मतदानाचा हक्क 
शहरातीलबहुतेक केंद्रांवर निवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही मतदानात मोठ्या प्रमाणात भाग घेतला. सकाळी वाजेपासूनच बहुतांश मतदान केंद्रांवर त्यांची मोठी संख्या दिसून आली. ज्येष्ठ नागरिक या नात्याने निवडणूक यंत्रणेनेही त्यांना चांगले सहकार्य केले. त्यांच्यातील उर्मी राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याप्रतीची जागरुकता लक्षात घेता इतरांनीही प्रेरित होऊन मतदानासाठी धाव घेतली. 

निकाल लागणार फेब्रुवारी रोजी 
दिवसभराच्या मतदानानंतर सर्व मतपेट्या अमरावती येथील मतमोजणी स्थळी पाठवण्यात आल्या आहेत. सोमवार, फेब्रुवारीला मतमोजणी केली जाणार आहे. अमरावतीच्याविभागीय क्रीडा संकुलात  सकाळी वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. तोपर्यंत सर्व मतपेट्या त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रुममध्ये कडक पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. 

१३ उमेदवार आहेत रिंगणात: यानिवडणुकीत १३ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भाजपचे डॉ. रणजित पाटील, काँग्रेसचे संजय खोडके, प्रहारचे डॉ. दीपक धोटे, प्राउटिस्ट ब्लॉक इंडियाचे दिलीप सुरोशे, रिपब्लिकन सेनेच्या नीता गहरवाल. अपक्ष ॲड. अरुण ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर, डॉ.अविनाश चौधरी, गणेश तायडे, ॲड.संतोष गावंडे, जितेंद्र जैन, ॲड. डॉ. प्रा. लतीश देशमुख, प्रशांत काटे, प्रा. प्रशांत वानखेडे यांचा समावेश आहे. यािशवाय चौदाव्या क्रमांकावर नोटा (नन ऑफ अबूव्ह)चे बटन देण्यात आले होते. 
बातम्या आणखी आहेत...