आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवीधरांच्या नोंदणीसाठी उघडली १४० केंद्रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी विभागातील पाचही जिल्ह्यात १४० केंद्रे उघडण्यात आली आहेत. या सर्व केंद्रांची अधिसूचना आज, शनिवारी घोिषत झाली असून मतदार नोंदणीही सुरु झाली आहे.
अकोला शहरात यासाठी केंद्रांची सोय उपलब्ध करुन देण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व आठही तहसील कार्यालयांमधिल एसडीओ आणि तहसीलदारांची कार्यालयेही यासाठी सज्ज झाली आहेत. मतदार यादीत त्रुट्या असल्याच्या कारणाहून न्यायालयाने अलीकडेच या मतदारसंघाची यादी रद्द करवली होती. त्यामुळे मतदार नोंदणीसाठी नव्याने कार्यक्रम घोषित करण्यात आला असून त्याचा रितसर प्रारंभ आज, शनिवारी झाला.

नोव्हेंबर २०१६ च्या तीन वर्षांपूर्वी पदवीधर झालेले व्यक्ती यासाठी पात्र आहेत. त्यामुळे त्यांनी पदवी प्रमाणपत्र, स्वत:चे छायाचित्र निवासी पुरावा घेऊन मतदार नोंदणी अर्ज (नमूना १८) भरावा, असे यंत्रणेने कळविले आहे. ही प्रक्रिया आगामी नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. दरम्यान या नोंदणीत अमरावती विभागातील सर्व रहिवासी पदवीधरांनी सहभागी होऊन यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी केले आहे.

मतदार नोंदणीसाठी अमरावती विभागात १४० केंद्रे उघडण्यात आली असून त्यापैकी सर्वाधिक २७ केंद्रे अमरावती शहरात अाहेत. २१ केंद्रे जिल्हािधकारी कार्यालय इतर ठिकाणी आहेत. तर सहा केंद्रे विभागीय आयुक्त कार्यालयात आहेत.

यवतमाळ जिल्ह्याच्या ठिकाणी १४ केंद्रे असून त्याखालोखाल प्रत्येकी ११ केंद्रे अकोला बुलडाणा शहरात आहेत. वाशिममध्ये सात ठिकाणी ही व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्येही सोय
पदवीधरमतदार नोंदणीची सोय १४० ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली असली तरी त्यातील निम्मी केंद्रे ही त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयमध्ये आहे. या सर्व केंद्रांची नावेही आजच्या अधिसूचनेत प्रकािशत करण्यात आली असून त्यािठकाणीही मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...