आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवीधरांच्या नोंदणीसाठी तीनवेळा ‘नोटीफिकेशन’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पदवीधर मतदारसंघाची संपूर्ण यादी नव्याने तयार करावी लागणार असल्याने त्यासाठी एक किंवा दोन नव्हे तर तब्बल तीनवेळा नोटीफिकेशन जारी केले जाणार आहे. यातील पहिला टप्पा एक ऑक्टोबरलाच पूर्ण झाला असून आगामी १५ २५ ऑक्टोबरला या कृतीची पुनरावृत्ती केली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भारत निवडणूक आयोगाने अलीकडेच अमरावती पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी रद्द ठरवली. त्याचवेळी ही संपूर्ण यादी अवघ्या ३६ िदवसांत पूर्ण करण्याचे आव्हानात्मक कामही संबंधित यंत्रणेवर सोपवले. त्यामुळे पदवीधरांचे व्यापक जनजागरण आवश्यक झाले असून त्याचाच एक भाग म्हणून नोंदणीची अधीसूचना तीन वेळा प्रकाशित केली जाणार आहे.

यातील पहिला टप्पा गेल्या एक ऑक्टोबरलाच पूर्ण झाला. दरम्यान त्या दिवसापासूनच पाचही जिल्ह्याच्या १४० केंद्रांवर मतदार नोंदणीचे कामही सुरु झाले आहे.
या कामाला अधिक गती मिळावी पदवीधरांनी स्वत:हून या प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी १५ २५ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा ही अधीसूचना प्रकािशत केली जाणार आहे.
रद्द करण्यात आलेल्या मतदार यादीत अकोला जिल्ह्यातील सुमारे ४३ हजार मतदारांचा समावेश होता. ती सर्वच नावे आता नव्याने समाविष्ट करावी लागत आहे. त्यासाठी जिल्हािधकारी कार्यालयातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार अव्वल कारकूनांसह चारही एसडीओ, आठही तालुका दंडािधकारी, जिल्ह्यातील सर्व नायब तहसीलदार आणि जिल्हा परिषदेतील विविध अधिकाऱ्यांना या कामात गुंतवण्यात आले असून, एकूणच निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.

१५ २५ ऑक्टोबरला पुन्हा प्रसिद्धी देऊ
पदवीधरांच्या नोंदणीसाठी अत्यल्प कालखंड शिल्लक असल्याने नोंदणीसाठीची अधीसूचना तीन वेळा जारी केली जाणार आहे. यातील पहिले प्रकाशन ऑक्टोबरला पूर्णत्वास गेले. १५ २५ ऑक्टोबरला त्यास पुनर्प्रसिद्धी दिली जाईल.

यादीची अंतीम घोषणा ३० डिसेंबरला
निवडणूकआयोगाने आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार नोव्हेंबरपर्यंत मतदारांची नोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर १९ तारखेला प्रारुप मतदार यादीचे मुद्रण पूर्ण करुन (डाटा फिडींग) २३ नोव्हेंबरला ती प्रकािशत केली जाईल. दरम्यानच्या काळात डिसेंबरपर्यंत या यादीवरील हरकती सूचना स्वीकारल्या जाऊन २६ तारखेपर्यंत ते संपुष्टात आणले जाईल. अशाप्रकारे ३० डिसेंबरला अंतीम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...