आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धान्य बाजारात तब्बल १० ते १५ टक्के दरवाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - जूनच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्यामुळे धान्य, डाळीचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले होते. मात्र, पाऊस लांबल्यामुळे भाजीपाल्यासह धान्याचे भाव कडाडले आहेत. घाऊक बाजारात काही प्रमाणात भाव घटले असले तरी किरकोळ बाजारात धान्य आणि डाळींच्या दरांमध्ये मात्र १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. तसेच पावसाअभावी सध्या धान्य बाजारातील उलाढालही मंदावली आहे.

बहुतांश नागरिक मार्च, एप्रिल आणि मेमध्ये सर्वसाधारणपणे वर्षभराचा अथवा सहा महिन्यांचा धान्याचा साठा करून ठेवतात. त्यात गहू, विविध डाळी, तांदळाचा समावेश असतो. त्यामुळे धान्य बाजारातही उत्साह असतो. परंतु; संपूर्ण बाजाराचे गणित हे पावसावर अवलंबून असल्याने जूनमध्ये पावसाने चांगली हजेरी लावल्याने धान्य, डाळींच्या भावात घसरण झाली होती. मात्र, पाऊस लांबल्याने भाव वाढत आहे.

भारतातून दरवर्षी तांदळाची निर्यात होत असते; परंतु यंदा ती झाली नाही, त्यामुळे सहा महिन्यांपासून भाव स्थिर आहेत. किरकोळ विक्रीत मूग डाळ महाग झाल्याने ती ११० रुपये किलोने मिळत आहे, तर तूर डाळ १२० रुपये, हरभरा डाळ ६० रुपये, उडीद डाळ ११० रुपये प्रतिकिलो या भावाने मिळत आहे. तर, होलसेल बाजारात तूर, मूग, उडीद, हरभरा डाळीचे दर हे गेल्या महिन्यात किलोला ११० ते १२० रुपयांपर्यंत होते. आता हे दर १०० ते ५५ रुपयांपर्यंत आले आहेत. विशेष म्हणजे मूग डाळीचे दर हे मागील महिन्यात प्रतिकिलोसाठी ११० ते १२० रुपयांपर्यंत होते. आता हे दर १०० ते ५५ रुपयांपर्यंत आले आहेत. विशेष म्हणजे मूग डाळीचे दर १२० रुपयांपर्यंत गेले होते, परंतु उन्हाळी मुगाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने सध्या या डाळीचे दर ८५ ते ९० रुपयांपर्यंत आले आहेत. तसेच गव्हाचे भावही क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांनी घसरले आहेत. आणखी काही दिवस पाऊस आल्यास धान्य, कडधान्याचे भाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. बाजारातील उलाढाल मंदावली आहे.

तेलाचे भाव वाढण्याची शक्यता
पाण्याअभावीडाळीचे भाव वाढण्याची शक्यता आहे. साखरेचे दर साधारण असले तरी तेलाचे भाव वाढतील, अशी शक्यता आहे. फकिरचंदशांतीलाल छाजेड, किराणा व्यावसायिक

साबुदाणा, शेंगदाण्यांचेही भाव वाढणार
चवळी१०० रुपये किलो, वाटाणा ६० रुपये किलो, हरभरा ५५ रुपये किलो, मठ ११० रुपये किलो या कडधान्यांच्या भावासह त्यांची आवक मागणीही स्थिर आहे. तसेच आषाढी एकादशीसह श्रावण उपवासांना सुरुवात होणार असल्याने साबुदाणा, शेंगदाणे यांच्या मागणीत वाढ होणार असून, साबुदाणा ७० रुपये किलो शेंगदाणा १०० रुपये किलो आहे. मात्र, उपवासामुळे या खाद्यपदार्थांत दरवाढ होण्याची शक्यता व्यापा-यांनी वर्तवली आहे.
बातम्या आणखी आहेत...