आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेशनअभावी गरीबांचे उत्सवपर्व अडचणीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दसरा सण मोठा-नाही आनंदाला तोटा असे पूर्वापार म्हटले जाते. परंतु जिल्ह्यातील गोरगरीबांच्या बाबतीत यावर्षी हे सुभाषित खोटे ठरले आहे. दसरा उंबरठ्यावर येऊन ठेपला असतानाही स्वस्त धान्य दुकानात रेशन उपलब्ध नसल्याने बाजारातील चढ्या दराचे अन्न-धान्य खरेदी करुन या नागरिकांना आपली निकड भागवावी लागत आहे.
जिल्ह्यात लाख ४९ हजार २८७ रेशन कार्डधारक आहेत. यापैकी १६,२५९ शुभ्र कार्डधारक आणि अंदाजे २५ हजार केशरी कार्डधारक वगळता इतर सर्वांना स्वस्त धान्य दुकानांतून रेशनचा पुरवठा केला जातो. परंतु मंगळवारचा दसरा असतानाही या महिन्यात तो अद्याप वितरित केला गेला नाही. त्यामुळे सणासुदीला अग्रीम काळातच रेशन दिले जाईल, ही सरकारी घोषणा हवेत विरली आहे.

अकोला शहर ग्रामीण आणि त्याला जोडून असलेल्या इतर सात तालुक्यांना रेशनचा पुरवठा करण्यासाठी जिल्हाभरात हजार ५२ दुकानांचे जाळे आहे. यापैकी बहुतेक दुकानदारांनी चलानही (रेशनची उचल करण्यासाठी भरावी लागणारी रक्कम) भरले. परंतु त्यांना अद्याप धान्य मिळाले नाही. त्यांनाच मिळाले नसल्याने स्वाभाविकपणे गोरगरीब नागरिकांपर्यंतही ते पोचले नाही.
अंत्योदय (बीपीएल), प्राधान्य गट तसेच एपीएलमधिल शेतकरी आणि प्राधान्य गटात मोडणाऱ्या कार्डधारकांनाच रेशनचा गहू-तांदुळ डाळ दिली जाते. अंत्योदयवाल्यांना साखरही मिळते. परंतु दसऱ्याआधी मात्र यापैकी काहीएक मिळाले नाही, हे सध्याचे वास्तव आहे. त्यामुळे दसऱ्यासारख्या मोठ्या सणाला आनंदात तोटा, अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.

महिन्यातून एकदाचे नियोजन
^रेशनचे धान्यवितरित करण्यासाठी सणा-सुदीचे पर्व म्हणून नव्हे तर महिन्यातून एकदा असे प्रशासकीय नियोजन असते. त्यातही दिवाळीपूर्वी रेशन देण्याचा दरवर्षी प्रयत्न केला जातो. यावर्षी दिवाळी मुळातच महिन्याच्या शेवटी असल्याने त्यापूर्वी सर्वांनाच धान्य मिळालेले असेल.'' अनिलटाकसाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.

महाग डाळ घ्यावी कशी?
^बीपीएलप्राधान्य गटातील कार्डधारकांना दोन रुपये किलो दराने गहू तीन रुपये किलोने तांदुळाचा पुरवठा केला जातो. अशा स्थितीत त्यांनी १०३ रुपये किलोची डाळ कशी घ्यावी? ते गरीब आहेत, हे मान्य करुनच शासनाने त्यांना दोन रुपये किलोचे धान्य देणे सुरु ठेवले आहे. मग ही महाग डाळ घेण्याची सक्ती का? '' नयनगायकवाड, मजूर नेते, अकोला.

डाळीची अप्रत्यक्ष सक्ती
या महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानांतून डाळीचाही पुरवठा केला जात आहे. हा डाळ पुरवठा अंत्योदय प्राधान्य गटातील केशरी कार्डधारकांसाठीच आहे. त्यामुळे या गोर-गरीबांना अप्रत्यक्षपणे डाळ खरेदीची सक्तीच केली जात आहे. परंतु एवढी महाग डाळ का घ्यायची, असा या घटकाचा प्रश्न आहे.
बातम्या आणखी आहेत...