आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायतीसाठी आज होणार मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यातील२२० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तर ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी मंगळवार, ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील ९२५ मतदान केंद्रांवर ही निवडणूक घेण्यात येत असून, ४,०५२ निवडणूक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. निवडणुकीदरम्यान शांतता सुव्यवस्था राखावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.

ऑगस्ट सप्टेंबर २०१५ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. मंगळवारी सकाळी ते सायंकाळी वाजेदरम्यान मतदान घेण्यात येणार आहे. यापैकी १५ ग्रामपंचायतींच्या अविरोध निवडणुकीवर शिक्कामोर्तब झाले आहे. दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द झाल्या आहेत. त्यामुळे २०३ ग्रामपंचायतींसाठी आज निवडणूक घेण्यात येत आहे, तर जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका घेण्यात येत असून, यांपैकी २५ ग्रामपंचायतींच्या ४१ सदस्य पदांसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल झालेली नाहीत. त्यामुळे १४ ग्रामपंचायतींच्या २२ सदस्य पदांसाठी मतदान घेण्यात येत आहेत. त्यासाठी एकूण ४८ उमेदवार रिंगणात आहेत.
निवडणुकीच्या दृष्टीने सोमवार, सकाळीच र्इव्हीएम मशीन संबंधित गावातील मतदान केंद्रांवर रवाना झाल्या होत्या. शासकीय धान्य गोदाम, खदान अकोला येथून र्इव्हीएम मतदान केंद्राध्यक्ष मतदान केंद्राधिकारी घेऊन रवाना झाले. सायंकाळपासून मतदान प्रक्रियेच्या तयारीला निवडणूक कर्मचारी लागलेले दिसून आले. या ठिकाणी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार संतोष शिंदे, नायब तहसीलदार महेंद्र आत्राम, पूजा माटोडे, प्रतीक्षा तेजनकर, आराधना निकम, मंडळ अधिकारी अजय तेलगोटे, अव्वल कारकून संतोष इंगळे उपस्थित होते.

तालुका ग्रामपंचायत सदस्य उमेदवार
तेल्हारा २७ २०२ ४३४
अकोट ३५ २७१ ६०२
बाळापूर ३३ ३२६ ६७६
अकोला ४० ३९४ ११३५
मूर्तिजापूर २४ १८० ४११
पातूर १९ १३४ ३२४
बार्शिटाकळी २५ २०० ४६२
एकूण २०३ १६४७ ४०४४

ग्रामपंचायत श्रेत्रात सुटी
निवडणूकप्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मंगळवार, ऑगस्ट रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. हा आदेश फक्त ज्या निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात लागू राहणार आहे. इतर ठिकाणी सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहतील.
बातम्या आणखी आहेत...