आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: 272 ग्रामपंचायतींच्या 2118 जागा; 2803 उमेदवार रिंगणात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतीच्या २११८ सदस्यांसाठी हजार ८०३ उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या िदवशी ९९६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता २८०३ उमेदवार शिल्लक आहेत. 
 
दुसरीकडे पहिल्यांदाच थेट निवडणुकीचा सामना करीत असलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी माघारीअंती ८९७ उमेदवार मैदानात उरले आहेत. या निवडणुकीसाठी १२२६ नागरिकांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यापैकी ३२९ जणांनी माघार घेतली आहे. 
 
डिसेंबर २०१७ मध्ये कालावधी संपणाऱ्या २७२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आगामी ऑक्टोबर रोजी होत आहे. ला मतदान झाल्यानंतर ऑक्टोबरला मतमोजणी होईल. या मतमोजणीतून आपलेच नाव बाहेर पडावे, यासाठी प्रत्येक उमेदवार खटाटोप करीत आहे. 
निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या कार्यक्रमानुसार या निवडणुकीसाठी १५ सप्टेंबरपासून ऑनलाइन नामांकन स्वीकारले गेले. २२ सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख होती. मधल्या दोन दिवसांच्या सुटीनंतर २५ सप्टेंबरला छाननी करण्यात आली. त्यानंतर २७ ला इच्छूकांना आपले नामांकन परत घेण्याची संधी देण्यात आली. ही तारीख उलटून गेल्यानंतर सदस्यांसाठी हजार ८०३ तर सरपंचांसाठी ८९७ उमेदवार रिंगणात उरले आहेत. 
 
या निवडणुकीत सर्वाधिक ५५ ग्रामपंचायती अकोला तालुक्यातील आहेत. त्यामुळे याठिकाणाहून विजयी होणाऱ्या उमेदवारांची संख्याही सर्वाधिक ४११ राहणार असून वेगवेगळ्या १६९ प्रभागांमधून त्यांची निवड घोषित केली जाईल. त्याखालोखाल ५१ ग्रामपंचायती मुर्तीजापूर तालुक्याच्या असून बार्शिटाकळी तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींमध्ये ही निवडणूक होत आहे. अकोटमध्ये ३७, पातूरमध्ये २८, बाळापूरमध्ये २७ तर तेल्हाऱ्यात २४ ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक घेतली जात आहे. 
 
दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत कोण माघार घेणे हे स्पष्ट झाले नव्हते. आता मात्र निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, आपल्या पॅनलचे जास्तीत जास्त उमेदवार आणि सरपंचपदाचा उमेदवार कसा निवडून येईल याची जोरदार माेर्चेबांधणी केली जात आहे. एकूणच गावांमधील वातावरण तापले आहे. 
 
११९५ महिलांना मिळणार संधी 
यानिवडणुकीद्वारे ११९५ महिलांना विजयी होण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये अनुसूचित जातीच्या ३१५, अनुसूचित जमातीच्या ११४, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील (ओबीसी एसबीसी) २७९ आणि खुल्या संवर्गातील ४८७ महिलांचा समावेश असेल. अनारक्षीत जागांवरुनही महिलांना निवडणूक लढण्याची मुभा असल्याने त्यांची एकूण संख्या ही ११९५ पेक्षाही जास्त राहणार आहे. एकूणच ग्रामपंचायतीमध्येही आगामी काळात महिला राज पहावयास मिळणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...