आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gram Panchayat Of Peons Riding The Red Hand Taking Bribes

ग्रामपंचायतीच्या शिपायास लाच घेताना रंगेहात पकडलेे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ‘नमुनाअ’साठी तीन हजार रुपयांची लाच घेताना पातूर तालुक्यातील शिर्ला येथील ग्रामपंचायतचा शिपाई संजय खर्डे याला रंगेहात पकडले. सरपंच सेवानिवृत्त ग्रामसेवक यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराची शिर्ला ग्रामपंचायत शिवारात ४० गुंठे शेतजमीन अाहे. त्यामुळे त्यांना काही कामानिमित्त ग्रामपंचायतीचा ‘नमुना अ’ पाहिजे होता. त्यासाठी त्यांनी वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात चकरा मारल्या. मात्र, ग्रामसेवकाची भेट झाली नाही. ग्रामपंचायत कार्यालयातील शिपाई संजय खर्डे याने ‘नमुना अ’साठी तीन हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराच्या तक्रारीवरून लाचलुचपत खात्याचे पोलिस उपअधीक्षक यू. के. जाधव यांनी सोमवारी दुपारी वाजता सापळा रचला. संजय खर्डेच्या कृत्यास सरपंच शब्बीर भाई यांनी प्रोत्साहन दिल्याचे आढळून आले. याप्रकरणी सरपंचाने मदत केली. खर्डे याने शिर्ला येथील सेवानिवृत्त ग्रामसेवक महादेव हिरळकार यांचे घरी जाऊन नमुना आठ बनवून आणला तीन हजार रुपयांची लाच घेतली. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी संजय खर्डे यास रंगेहात पकडले. याप्रकरणी सरपंच शब्बीर भाई, शिपाई संजय खर्डे, सेवानिवृत्त ग्रामसेवक महादेव हिरळकार यांच्या विरुद्ध कलम ७,१२,१३ (१)ड सह १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

दोघे ताब्यात
याप्रकरणीलाच घेणारा शिपाई संजय खर्डे सेवानिवृत्त ग्रामसेवक हिरळकार या दोघांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत कारवाईची प्रक्रिया सुरू होती.

ग्रामसेवकाचा मोह सुटेना
पंचायतमध्ये कित्येक वर्षे नोकरीकरूनही ग्रामपंचायतच्या कामकाजाचा मोह महादेव हिरळकार यांचा सुटला नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच त्यांनी पैशांसाठी ही चूक केली आहे. नोकरीनंतरही ग्रामपंचायतच्या कामात हस्तक्षेप करून गैरकृत्य करणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे.