आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोषी कृषि वितरकांवर कारवाई करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - ‘हरभरा बियाणे घोटाळ्यात संशयास्पद कृत्य करणाऱ्या अाणि बियाणे पुरवठादार संस्थेला बाेगस (काल्पनिक) यादी सादर करुन शासनाच्या फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या कृषि वितरकांवर कारवाई करा,’ अशी सूचना जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी (एसएओ) यांनी पत्राद्वारे जि.प.च्या कृषि विकास अधिकाऱ्यांना (एडीअाे) केली अाहे. ही कारवाई फाैजदारी दंड प्रक्रिया संहिता अाणि बि-बियाणे अधिनियमान्वये करण्यात यावी, असेही पत्रात स्पष्ट करण्यात अाले अाहे. 
 
हरभरा बियाणे घोटाळ्यात कारवाईसाठी उच्चस्तरीय पथकात असलेल्या एसएओंनी एडीअाेंना पाठवलेल्या पत्रांमध्ये विविध बाबींचा उहापोह केला अाहे. या पत्रानुसार महाबीज, राबिनी कृभकाे या बियाणे पुरवठादार संस्थांकडून प्राप्त झालेल्या याद्यांची (यादीमध्ये शेतकऱ्याचे नाव, पत्ता, वितरित बियाणे यांची माहिती हाेती) तपासणी करण्यात अाली. ही १०० टक्के शेतकऱ्यांची तपासणी संबंधित क्षेत्रीय अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून करण्यात अाली. अनेक संबंधित शेतकऱ्यांनी अनुदानित दराने हरभरा प्रामािणत बियाणे खरेदी केले नसल्याचे जवाब नोंदवले अाहेत, असे पत्रात म्हटले अाहे. वितरकांनी बियाणे वाटप करताना संशयास्पद कृत्य केल्याचे दिसून येत असून, बियाणे पुरवठा करताच शेतकऱ्यांच्या नावाने खाेटी देयके तयार केली अाहेत. ही खाेटी देयके पुरवठादार संस्थेस सादर करुन शासनाच्या फसवणुकीचा प्रयत्न केल्याचे पत्रात नमूद केले अाहे. त्यामुळे याप्रकरणी सक्त कार्यवाही करुन अहवाल सादर करण्यात यावा, असेही एसएओंनी पत्रात स्पष्ट केले अाहे. 

२११ कृषि केंद्र संशयाच्या भोवऱ्यात : काल्पनिकनावाने ( यादीनुसार पत्त्यावर सापडलेल्या ) देयक सादर केलेल्या कृषि सेवा केंद्रांची संख्या २११ अाहे,असे चाैकशी अहवालात नमूद केले. यात सर्वाधिक १९२ केंद्र महाबीज अंतर्गत असून, राबिनिचे १२ ,कृभकाेचे अाहेत. त्यामुळे या घोटाळ्यात काेण ‘वाटेकरी’ अाहेत, काेणी किती तुंबड्या भरल्या हे शाेधण्याची मागणी हाेत अाहे. 

पुरवठादार संस्थांचा असाही कारभार : हरभराबियाणे घोटाळ्यात महाबीज, राबिनि कृभकाे या बियाणे पुरवठादार संस्थांचा कारभार चव्हाट्यावर अाला अाहे. या संस्थांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बियाणे देता पुरवठा केल्याचे भासवून अनुदानाची मागणी केल्याचे चाैकशी अहवालात नमूद केले अाहे. शेतकरी संख्या ६३१ असून, यामध्ये महाबीजचे ६०९ कृभकाेच्या २२ शेतकऱ्यांचा समावेश अाहे. 

बियाणे देताच अनुदानाची मागणी, परवाना रद्द करण्याचीही शिफारस 
बियाणे पुरवठादार संस्थांनी ५१३ क्विंटल बियाणे देताच बियाणे दिल्याचे भासवून अनुदानाची मागणी केल्याचा प्रकार चाैकशी दरम्यान उजेडात अाला. यामध्ये सर्वाधिक बियाणे ४८६.१५ क्विंटल बियाणे महाबीजचे असून, कृभकाेचे २६.७० क्विंटल बियाणे अाहे. पुरवठादार संस्थांच्या यादीनुसारच्या तपशीलापेक्षा ५० क्विंटल कमी बियाणे देण्यात अाले. यामध्ये महाबीजचे ४४.४० क्विंटल, राबिनि-४ .५ कृभकाेच्या ०.६० क्विंटल बियाण्यांचा समावेश अाहे. यात अशा शेतकऱ्यांची संख्या ११७ असून, सर्वाधिक १११ शेतकरी महाबीजच्या यादीतील अाहेत. तसेच राबिनिचे -०४ अाणि कृभकाेच्या यादीतील शेतकऱ्यांचा समावेश अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...