आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरभरा बियाणे घाेटाळ्यात २११ कृषी सेवा केंद्र रडारवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - हरभरा बियाणे घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कारवाईच्या हालचाली सुरू केल्या असून, उच्चस्तरीय चाैकशी पथकाने अहवालात ठपका ठेवलेल्या २११ कृषी सेवा केंद्रांना नाेटीस बजावण्यात येणार अाहे. त्यानंतर प्रत्येकाची सुनावणी घेऊन कारवाई करण्यात येणार अाहे. 
 
सन २०१६मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना रबी हंगाम अनुदानावरील बियाण्यांचे वितरण करण्यात अाले हाेते. शासन अंगीभूत असलेल्या कृभकाे ( कृषक भारती काे-अाॅप.) राबिनी (राष्ट्रीय बीज निगम) महाबीज या बियाणे पुरवठादार संस्थांना बियाण्यांचे वितरण करण्याचा अादेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिला हाेता. मात्र शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा अाराेप झाल्यानंतर विभागीय कृषी सह संचालकांनी उच्चस्तरीय चाैकशीचा अादेश दिला हाेता. 

बियाणे वितरणात शासनाची ९९ लाख ४९ हजार रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात अाला, असा ठपका चाैकशी पथकाने चाैकशी अहवालात ठेवला. या संस्थांनी ३०.३८ टक्के रक्कमेची जादा देयके सादर केल्याचा प्रकार चाैकशीच्या माध्यमातून समाेर अाला हाेता. दरम्यान, हरभराबियाणे घोटाळ्याप्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्याचा ठराव गुरुवारी जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत घेण्यात आला होता. 

महाबीजचेसर्वाधिक सेवा केंद्र संशयाच्या भाेवऱ्यात 
बियाणे घोटाळ्यात एकूण २११ कृषी सेवा केंद्र संशयाच्या भाेवऱ्यात सापडले अाहेत. या कृषी केंद्रांनी खाेट्याने नावाने देयक सादर केली अाहेत. यामध्ये सर्वाधिक १९२ महाबीजची असल्याचे चाैकशी अहवालात नमूद करण्यात अाले अाहे. चाैकशी पथकाने यादीनुसार शेतकऱ्यांची पडताळणी केली असता घोळ झाल्याचे दिसून आले. आता जिल्ह्यातील २११ कृषी सेवा केंद्रांना नोटीस बजावण्यात येणार असून प्रत्येकाची सुनावणी होणार आहे. 

तालुका निहाय झालेला घाेळ 
तालुका पत्त्यावर आढळून बियाणे (क्विं.)अालेलेशेतकरी 
अकाेला १८६८ १५३१.४० 
बार्शीटाकळी २४७ ३१७.३ 
मूर्तिजापूर ६१ ४६.५ 
अकाेट ५१० ३७३.७ 
तेल्हारा ७५२ ५४१.९ 
बाळापूर १७३ १३५.८ 
पातूर २९७ १६५.३ 
एकूण ३९०८ ३१११.९ 

अशीही तफावत 
चाैकशी अहवालातून राेज नवीन माहिती उजेडात येत अाहे. महाबीज या बियाणे पुरवठादार संस्थेने सादर केलेल्या यादीनुसार चाैकशी पथकाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे जाऊन पडताळणी केली. यामध्ये ४४.४ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांनी मात्रापेक्षा कमी खरेदी केल्याचे उजेडात अाले. यामध्ये सर्वाधिक अकाेला तालुक्यातील १९.५ क्विंटल बियाण्यांचा समावेश अाहे. बार्शीटाकळी-११.३ (क्विंटल ), मूर्तिजापूर ३.६ (क्विंटल ), तेल्हारा तालुक्यात १० क्विंटल बियाण्यांची तफावत असल्याचे आढळून अाले. 

स्थायी समितीच्या सभेतही घाेटाळा गाजणार 
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा २६ जुलै राेजी अायाेजित करण्यात अाली अाहे. या सभेतही हरभरा घाेटाळा गाजण्याची शक्यता अाहे. कृषी केंद्रांचे नियंत्रण जि.प.च्या कृषी विभागाकडे असल्याने नियमित तपासणीत घाेटाळा ना उजेडात अाला नाही, केंद्रांमधून देण्यात अालेल्या देयकांमध्ये त्रुटी असल्याचे देयक बुक तपासणीच्या वेळी का लक्षात अाले नाही, असे एक ना अनेक सवाल अाता उपस्थित करण्यात येत असून, यावरुन सभेत सदस्य अाक्रमक हाेण्याची शक्यता अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...