आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाैजदारी कारवाईवर प्रश्नचिन्ह , कृषी अधिकाऱ्यांची केवळ चर्चाच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - अनुदानित हरभरा बियाणे घाेटाळ्यात राेज नवीन मािहती उजेडात येत असून, या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पाेिलसांना लेखी तक्रारच सादर केली नसून केवळ चर्चा केली हाेती. त्यामुळे सध्या पाेिलसांकडे लेखी तक्रारच नसल्याने अाता फाैजदारी कारवाई केव्हा हाेणार, हे अाता प्रशासनही सांगण्यास तयार नाही. 
 
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअतंर्गत रबी हंगाम अनुदानावरील बियाण्याचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात अाला. हरभरा बियाण्याची शेतकऱ्यांकडून मागणी जास्त होत होती. त्या तुलनेत पुरवठा कमी होता. शक्य तितक्या लवकर भरभरा बियाणे पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात अाला. मात्र शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा प्रकार नाेव्हेंबर राेजी शिवसेनेने घेतलेल्या पुढाकारामुळे उजेडात अाला हाेता. जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाचे अधिकारी शिवसेना नेत्यांनी कृषि केंद्रांची पाहणी केली. प्राथमिक चाैकशीत अनेक बाबी उजेडात अाल्या हाेत्या. अनेक व्यापाऱ्यांनी हे बियाणे शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतरांना विकल्याने सामान्य शेतकरीच बियाण्यांपासून वंचित रािहल्याचा अाराेप झाला हाेता. चाैकशीदरम्यान कृषि विभागाने काही कृषी केंद्रांच्या दस्तावेजांची पडताळणी केली हाेती. 

तक्रारीचा प्रवास 
बियाणे घाेटाळ्याप्रकरणी कृषि विभागाने प्रथम अाकाेट फैल पाेिलस ठाण्यात तक्रार दिली. पाेिलसांनी तक्रार वाचली. मात्र नंतर हे प्रकरण हद्दिवरुन वरिष्ठ पाेिलस अधिकाऱ्यांपर्यंत पाेहाेचले. त्यानंतर कृषि अधिकाऱ्यांनी रामदास पेठ पाेिलसांकडे धाव घेतली. त्यांनी तक्रार दिली. मात्र चर्चेअंती परत घेतली. अाता हे प्रकरण जिल्हा अधीक्षक कृषि अधिकाऱ्यांकडे (एसएअाे) वर्ग करण्यात अाले अाहे. त्यामुळे त्यांच्याकडून केव्हा चाैकशी पूर्ण हाेईल, केव्हा वरिष्ठांची मान्यता मिळेल अाणि केव्हा पाेिलस गुन्हा दाखल करतील, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत अाहे. 

काय अाहे जबाबात? 
उगवापरिरसातील १५३ शेतकऱ्यांना बियाण्यांचे वितरण करण्यात अाले. त्यापैकी ३७ शेतकऱ्यांची जबाब नाेंदण्यात अाले. यापैकी २५ शेतकऱ्यांनी बियाणे मिळाले नसल्याचे सांगितले हाेते. ते शेतकऱ्यांनाच बियाणे मिळाले हाेते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाला चाैकशीत अाढळून अालेल्या बाबी अािण शेतकऱ्यांचे नाेंदवलेले जबाब, याअाधारे पाेिलसात तक्रार का करण्यात येत नाही, असा सवाल अाता उपस्थित करण्यात येत अाहे. 

चाैकशी सुरु अाहे 
हरभरा बियाणे वितरणाची चाैकशी सुरु अाहे. १०० टक्के तडताळणी केल्यानंतर वरिष्ठांकडे अहवाल पाठवण्यात येईल. त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई करण्यात येईल. - राजेंद्र निकम, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, अकाेला. 

परिपूर्णतेअभावी कारवाई रखडली? 
बियाणेघाेटाळ्या प्रकरणी कृषि विभागाने पाेिलसांना सादर केलेल्या दस्तावेज परिपूर्ण नव्हते. नेमका घाेळ कसा झाला, कुठे झाला, नेमकं जबाबदार काेण, कसे, निकष काय हाेते, नियम काेणते हाेते, या प्रश्नांची उत्तरेच मािहती-दस्तावेजातून मिळत नसल्याने गुन्हा दाखल कसा करावा, असे प्रश्न पाेिलसांना पडल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. 
 
बियाणे घाेटाळ्याप्रकरणी कृषि विभागाने दीपक कृषि सेवा केंद्र, किसान कृषि सेवा केंद्र, जयबजरंग कृषि सेवा केंद्र अाणि संजय कृषि सेवा केंद्रांचे परवाने महिन्यांसाठी निलंबित केले. कृषि केंद्रांच्या केलेल्या चाैकशीत पावतीवर शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव नसणे, पावती संबंिधत शेतकऱ्याची स्वाक्षरीच नसणे, विक्रीबाबतचे संपूर्ण अभिलेखे नसणे अादी अाक्षेपार्ह बाबी अाढळून अाल्या हाेत्या. 

काय म्हणतात अधिकारी ? 
बियाणे घाेटाळ्याबाबत कृषि विकास अधिकारी हनुमंत ममदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तक्रार केली नसून केवळ चर्चा केल्याचे सांगितले. याबाबत रामदास पेठचे ठाणेदार प्रकाश सावकर यांंच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही तक्रारच प्राप्त झाली नसल्याचे सांगितले. 
बियाणे वितरण सुरुवातीलाच निकष तयार नव्हते अाणि कार्यपद्धतीही अस्पष्ट हाेती. बियाणे वितरण करताना प्रथम शेतकऱ्यांकडून ७/१२ घेण्यात अाले. मात्र गरजू शेतकरी बियाण्यांपासून वंचित राहत असल्याने अाणि बियाण्यांचा काळा बाजार हाेत असल्याचा अाराेप झाल्यानंतर ७/१२साेबत छायाचित्र असलेले अाेळखपत्र घेण्याचा निर्णय घेण्यात अाला. मात्र ताे पर्यंत बहुता:श बियाणे संपले हाेते. 

तरीही कारवाईस विलंब का? 
बियाणे घाेटाळ्यात अनेक अाक्षेपार्ह बाबी उजेडात अाल्या हाेत्या. तरीही फाैजदारी कारवाईस विलंब का करण्यात येत अाहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत अाहे. 
बातम्या आणखी आहेत...