आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या दिवशी उमेदवारांची धांदल, ग्रामपंचायत निवडणुक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या पहिल्याच दिवशी अकोला तहसीलसह जिल्ह्यातील इतर ठिकाणांहून दीडशेहून अधिक उमेदवारांनी अर्ज घेण्यासाठी गर्दी केली होती. ऑनलाइन अर्ज भरण्याचे प्रशिक्षण देऊनही सेतू केंद्र संचालकांना अर्ज भरण्यासाठी विलंब लागत असल्याचे दिसून आले. सायंकाळी वाजेपर्यंत जिल्ह्यात एकाही उमेदवाराने तहसीलदारांकडे अर्ज सादर केला नाही.
जिल्ह्यातील ऑगस्ट ते ऑक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपणा-या जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शिटाकळी, पातूर, तेल्हारा मूर्तिजापूर या सातही तालुक्यांतील २२० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या नियंत्रणात सर्व एसडीओ तहसीलदारांच्या मार्गदर्शनात निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजाचा आज शुभारंभ झाला. १८ १९ जुलै हे सुटीचे दोन दिवस वगळता २० जुलैपर्यंत दररोज सकाळी ११ ते दुपारी वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत. ऑनलाइन प्रक्रियेबाबत उत्सुकता असलेल्या अनेक उमेदवारांनी मार्गदर्शन माहिती पुस्तिका मिळवण्यासाठी तहसील कार्यालय परिसरात गर्दी केली होती. तहसीलदार संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार पूजा माटोडे, नायब तहसीलदार महेंद्र आत्राम यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. तहसीलदार संतोष शिंदे यांनी १२ निवडणूक निर्णय अधिका-यांची बैठक घेऊन निवडणूकविषयक बाबींचे मार्गदर्शन केले.

थकबाकी नसलेला दाखला जोडा
महाराष्ट्रग्रामपंचायत अधिनियमच्या कलम १४, नुसार नामनिर्देशनपत्र भरण्यापूर्वी कोणताही कर किंवा फी थकबाकी नसल्याची पावती जोडणे आवश्यक आहे. उच्च न्यायालयाने पारित केलेले आदेश हे मालमत्ता करासंदर्भात असून, शासनाने मालमत्ता कर वसुलीस स्थगिती दिली आहे. त्यामुळे मालमत्ता कर वगळून इतर कर फीसंदर्भात या तरतुदी लागू राहतील. त्यामुळे उमेदवारांनी थकबाकी नसलेला दाखला जोडावा, असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार संतोष शिंदे यांनी केले आहे.

एकही अर्ज आला नाही
जिल्ह्यातीलसातही तालुक्यांतील तहसीलदारांकडून माहिती घेण्यात आली. मात्र, एकाही केंद्रावर एकाही उमेदवाराने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज सादर केला नाही.'' गजाननसुरंजे, जिल्हा निवडणूक अधिकारी, ग्रामपंचायत विभाग.

आवश्यक कागदपत्र
- घोषणापत्र
- शौचालय असल्याबाबत ग्रामसेवकाचा दाखला
- जात वैधता प्रमाणपत्रासाठी जात वैधता प्रमाणपत्र प्रस्तावाची पोचपावती
- थकबाकी नसलेला दाखला

अशी आहे प्रक्रिया
सेतूसुविधा केंद्र, ग्रामपंचायतींमधील संग्राम कक्ष किंवा इंटरनेट सुविधा असलेल्या कोणत्याही ठिकाणी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र भरता येणार आहेत. ऑनलाइन नामनिर्देशनपत्र भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून तहसीलदार तथा निवडणूक अधिका-यांकडे सादर करावी लागणार आहे.