आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पदवीधर’साठी 66 केंद्रांवर हाेणार अाज मतदान, 6 फेब्रुवारीला अमरावतीत हाेणार मतमाेजणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- उद्या,शुक्रवार फेब्रुवारी रोजी होत असलेल्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे साहित्य गुरुवारी दुपारीच सर्व ६६ केंद्रांवर पोहोचले आहे. तत्पूर्वी निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे यांच्या नेतृत्त्वात निवडणूक कर्मचाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर जिल्हाकचेरीतूनच सर्व पोलिंग पार्टीज मतदान केंद्रांकडे रवाना झाल्या. 

मतदान केंद्रांवर आवश्यक असलेली मतदार यादी, मतपत्रिका, मतपेटी, केंद्राधिकारी, केंद्राध्यक्ष आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पदनामाची फलके, नमूना मतपत्रिका, तोतयेगिरी करणाऱ्यांना तंबी देण्यासाठीचे सूचना फलक आणि स्टेशनरी असे प्रत्येक मतदान केंद्राचे साहित्य आहे. हे साहित्य संबंधित केंद्राधिकाऱ्याने स्वीकारल्याची रितसर नोंद यावेळी घेण्यात आली. प्रारंभी उपजिल्हािधकारी गजानन सुरंजे त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांना मतदानविषयक सूचना दिल्या. मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्षाचा निर्णय अंतीम असतो. त्यामुळे मतदारांबाबत त्यांचे अधिकार आणि कर्तव्ये यावेळी विषद करण्यात आली. संचालन गुणवत्ता विकास कक्षाचे समन्वयक प्रकाश अंधारे यांनी केले. विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानासाठी जिल्ह्याच्या सर्व सातही तालुक्यात ६६ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्ष मनुष्यबळाची जुळवाजुळव करताना मात्र ७६ केंद्रे गृहीत धरुन कर्मचारी-अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे दहा टक्के जादा अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून आपातकालीनवेळी त्यांचा वापर केला जाणार आहे. 

१३उमेदवार रिंगणात, १४ वा नोटा: यानिवडणुकीत १३ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भाजपचे डॉ. रणजीत पाटील, काँग्रेसचे संजय खोडके, प्रहारचे डॉ. दीपक धोटे, प्राउटिस्ट ब्लॉक इंडियाचे दिलीप सुरोशे, रिपब्लिकन सेनेच्या निता गहरवाल. अपक्ष ॲड. अरूण ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर, डॉ.अविनाश चौधरी, गणेश तायडे ॲड.संतोष गावंडे, जितेंद्र एन. जैन, ॲड. डॅा. प्रा. लताश देशमुख, प्रशांत काटे, प्रा. प्रशांत वानखेडे यांचा समावेश आहे. यािशवाय चौदाव्या क्रमांकावर नोटा (नन ऑफ अबाव्ह्)चे बटन देण्यात आले आहे. 

जिल्हाकचेरीत मतदार सहायता केंद्र: या मतदारसंघाची मतदार यादी अलीकडेच नव्याने तयार करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांना त्यांचा अनुक्रमांक मतदान केंद्र शोधताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान ही भीती लक्षात घेता जिल्हाकचेरीत मतदार सहायता केंद्र उघडण्यात आले आहे. याशिवाय मतदान केंद्र शोधण्यासाठी ऑनलाईन सर्च इंजीन देण्यात आले अाहे. 
 
सर्वांची उपस्थिती 
मतदानाच्या प्रक्रियेसाठी ७६ केंद्राध्यक्ष, तेवढेच मायक्रो ऑब्झर्व्हर आणि २२८ इतर कर्मचारी नियुक्त केले आहेत. तहसील कार्यालयात कार्यरत असलेले हे सर्व अधिकारी-कर्मचारी सकाळचे प्रशिक्षण शिबीर आणि त्यानंतरच्या साहित्य वितरण कार्यक्रमालाही उपस्थित होते.- गजानन सुरंजे, उपजिल्हािधकारी (निवडणूक), अकोला. 
 
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी घेतली बैठक  
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन गंभीर असून तशा सूचना सर्व स्तरावर देण्यात आल्या आहेत.
 
निवडणूक उपजिल्हािधकारी गजानन सुरंजे, निवासी उपजिल्हािधकारी श्रीकांत देशपांडे आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हािधकारी जी. श्रीकांत यांनी स्वतंत्र बैठकी घेऊन या मुद्द्यावर भर दिला आहे. गेल्या दोन दिवसांत शहरातील विविध सरकारी, निमसरकारी कार्यालयाचे विभागप्रमुख आणि स्वयंसेवी सेवाभावी संस्थांच्या प्रमुखांची बैठक घेण्यात आली. यातही मतदानाचा टक्का वाढविण्याचाच मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आला. 
बैठकीला पुरवठा विभागाचे ए. व्ही. सोळंके, नियोजन व‍िभागाचे आर. जी. सोनखासकर, एसडीओ कार्यालयाचे आर. एम. बोंडे, जीएसडीएचे एन. एस. चोपडे, कामगार कल्याण केंद्राचे अधीक्षक कमलाकर म्हस्के, धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे ए. पी. देशमुख, टपाल विभागाचे व्ही. के. मानकर, सहकारी संस्थांचे सहायक निबंधक व्ही. एम. बोर्डे, जीओआयचे पी. आर. महाले, आकाशवाणीचे एकनाथ नायके, जिल्हा परिषदेचे एस. टी. मराठे, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक डी. सी. खंडेराव, अन्न-धान्य वितरण विभागाचे निरीक्षक ए. जे. तेलगोटे, भूमी अभिलेखचे एस. एस. चव्हाण व्ही. के. जाधव, सांख्यिकी विभागाचे एस. डी. झटाले ए. एस. इंगळे, इतर अधिकारी प्रबोध धांदे, संध्या चिवंडे, उदय देशमुख, समाधान जाधव, श्याम राऊत, अब्दुल गालीब अब्दुल सत्तार, एस. पी. कौसल, सी. जे. निंघोट, के. एन. गिरी, के. एम. गिते, एस. पी. शेंडे, झेड. आय. सोमदेव, आर. बी. राठोड आदी उपस्थित होते. 
 
‘इव्हीएम’ नाही 
ही निवडणूक एकल संक्रमण पद्धतीने होत असल्यामुळे या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा (इव्हीएम) वापर केला जाणार नाही. त्यामुळे मतदारांना परंपरागत पद्धतीच्या मतपत्रावर आपला पसंतीक्रम (१,२,३...) नोंदवावा लागणार आहे. फेब्रुवारीला अमरावतीत मतमोजणी केली जाणार आहे. 
 
तालुका मतदार केंद्रे 
अकोला ३२,३४९ ३९ 
अकोट ४,५६३ ०६ 
तेल्हारा २,४३७ ०३ 
बाळापूर २,३६६ ०४ 
पातूर १,९३७ ०४ 
बार्शिटाकळी १,३५९ ०३ 
मुर्तीजापूर ३,३१३ ०७ 
एकूण ४८,३२४ 
बातम्या आणखी आहेत...