आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज बचतासाठी अाता हरित इमारत संकल्पना, सार्वजिनक बांधकाम विभागाने घेतला निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - वीज बचत पर्यावरणाचे संतुलन राखता यावे, यासाठी अाता हरित इमारत संकल्पना राबवण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला अाहे. याबाबतचा अादेश शुक्रवारी जारी केला असून, अादेशाची प्रत बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कार्यकारी अभित्यंत्यांना पाठवली अाहे. या प्रकल्पामध्ये नैसर्गिक उर्जास्त्राेतांचा वापर करण्यात येणार अाहे.
दिवसेंदिवस शहरीकरण वाढतच असून, निवासी व्यापारी संकुले उभारण्यात येत अाहेत. बांधकाम व्यवसायातील स्पर्धेमुळे इमारतीच्या दिखाऊपणाला प्रचंड महत्त्व अाले अाहे. अनेक ठिकाणी तर संपूर्ण इमारतच वातानुकुलीत असते. परिणामी जादा विजेचा वापर हाेताे. इमारतीच्या अंतर्गत सजावटीसाठी घातक वायू निर्माण हाेणाऱ्या साधनांचाही वापर हाेताे. इमारत बांधताना किंवा एखादा माेठा प्रकल्प उभारताना पर्यावरणाकडे दुर्लक्ष करण्यात येतेे. ही स्थिती लक्षात घेऊन शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या विविध नवीन इमारतींचे संकल्प ‘हरित इमारत संकल्पनेचा’ चा वापर करून नकाशे अाराखडे तयार करण्यात येणार अाहेत. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने अादेश जारी केला अाहे.

बांधकामाच्यावेळी ४० टक्के उर्जेचा वापर : इमारतप्रकल्पांच्या बांधकामावेळी ४० टक्के उर्जेचा वापर हाेताे. इमारत बांधकामाच्या क्रियांमुळे अंदाजे ५० टक्के हवा वायुचे प्रदूषण हाेते. ४२ टक्के हरित वायूचे विसर्जन ५० टक्के क्लाेराेफ्युराेकार्बन्सची निर्मिती हाेते.

अर्थव्यवस्थेवर परिणाम : दिवसेंदिवसइमारतींची संख्या वाढतच अाहे. त्यामुळे या इमारतींमध्ये उर्जेचा वापर वाढत अाहे. परिणामी विजेची मागणी दिवसेंदिवस वाढतच अाहे. सध्याची अार्थिक स्थिती लक्षात घेता वीज निर्मितीसाठीचा खर्च अर्थव्यवस्थेला पेलवणारा नाही. त्यामुळे वीज बचत अावश्यक अाहे.
हरितइमारत संकल्पना राबवण्याबाबत शासनाने सूचनांचे पालन करण्याचे सांगितले अाहे.
१)राज्य शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व इमारतीचे संकल्प ‘हरित इमारत संकल्पने’चा वापर करून नकाशे अाराखडे तयार हाेेणार अाहेत.
२) दुरुस्तीची कामे सुरू असलेल्या इमारतीमध्येही हरित इमारत संकल्पनेचा वापर करण्यात यावा.
३) पर्यावरणाचे संतुलन नैसर्गिक स्त्राेतांचा वापर इमारतीच्या प्रकल्पांमध्ये करावा. त्या अनुषंगाने नियोजनच करावे.
४) इमारतीच्या बांधकामाचे मान्यताप्राप्त संस्थांकडून अाॅडिट हाेणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...