आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी केंद्र संचालकांनी झटकली जबाबदारी, हरभरा बियाणे घाेटाळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - हरभरा बियाणे घोटाळ्याप्रकरणी काही कृषि केंद्रांच्या संचालकांनी जबाबदारी झटकली असून, शेतकऱ्यांकडून बियाणे मिळाल्याचे प्रतिज्ञापत्रच सादर केल्याचे समजते. बियाण्याबाबतची माहिती प्रतिज्ञापत्रामध्ये सादर करण्याचा अादेश महाबीजनेच वितरकांना दिला हाेता. त्यामुळे अाता याच प्रतिज्ञा पत्राचा वापर कृषि केंद्रांचे संचालक ढाल म्हणून करीत अाहेत.
 
सन २०१६मध्ये शेतकऱ्यांना रबी हंगाम अनुदानावरील बियाण्यांचे वितरण करण्यात अाले हाेते. कृभकाे ( कृषक भारती काे-अाॅप.) राबिनी (राष्ट्रीय बिज निगम) महाबीज या बियाणे पुरवठादार संस्थांना बियाणे वितरणाचा अादेश जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने दिला हाेता. मात्र बियाणे वितरणात शासनाची ९९ लाख ४९ हजार रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात अाला, असा ठपका चाैकशी पथकाने चाैकशी अहवालात ठेवला हाेता. या संस्थांनी ३०.३८ टक्के रक्कमेची जादा देयके सादर केल्याचा प्रकार चौकशीच्या माध्यमातून समाेर अाला हाेता.
 
अातापर्यंत१५ संचालकांची हजेरी : हरभराबियाणे घोटाळ्यात कृषि केंद्रांचे परवाने रद्द करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने १४२ कृषि केंद्रांना नोटीस बजावल्या हाेत्या. १२ सप्टेंबर राेजी अाणि १३ सप्टेंबर राेजी कृषि केंद्रांच्या संचालक सुनावणीसाठी हजर हाेते. यानंतर सोमवारपासून पुन्हा उर्वरित कृषि केंद्रांच्या संचालकांची सुनावणी हाेणार अाहे. दाेन दिवस माेठ्या िवतरकरांची हजेरी लावल्याने सुनावणीसाठी वेळ लागला. अाता लहान वितरकांची सुनावणी लवकर हाेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. सुनावणीसाठीी जि.प.च्या कृषि विभागाचे दाेन अाणि जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील दाेन अधिकारी उपस्थित हाेते.
 
काय हाेते प्रतिज्ञापत्रात
महाबिजने वितरकांना शेतकऱ्यांकडून माहिती घेऊन सादर करण्याची सूचना केली हाेती. त्यानंतरही माहिती जि.प.लाही सादर केल्याचे समजते. प्रतिज्ञापत्रात शेतकऱ्याचे नाव, गाव, तालुका, बियाण्याची मात्रा, स्वाक्षरी या रकान्यात माहिती नमूद केली हाेती. प्रतिज्ञा पत्रात ‘रब्बी हंगाम २०१६मध्ये अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत बियाणे खरेदी केले असून, ते शेतात पेरले हाेते. चांगले उत्पन्न मिळाले’, असेही शेतकऱ्यांकडून लिहून घेतले हाेते. प्रतिज्ञापत्रावर साक्षीदार म्हणून सरपंचाची स्वाक्षरी शिक्काही मारण्यात येत हाेता.
बातम्या आणखी आहेत...