आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर नियमानुसार "महासभा' स्थगित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मनपाची बुधवारीची महासभा अखेर सत्ताधारी गटाने नियमानुसार स्थगित केली. यापूर्वी नगरसेवकांना तोंडी माहिती देऊन सभा स्थगित केल्या. बुधवारची सभाही तहकूब करण्याचा निर्णय सत्ताधारी गटाने घेतला. मंगळवारी रात्री नगरसेवक, अधिकाऱ्यांना माहिती दिली. या अनुषंगानेच "दिव्य मराठी'ने बुधवारच्या अंकात महासभा पुन्हा अधिनियमांना धाब्यावर बसवून पुढे ढकलली, या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तामुळे खडबडून जागे झालेल्या सत्ताधारी गटाने नियोजित वेळेत सभा सुरू करून कोरमअभावी ही सभा स्थगित करत असल्याचे महापौरांनी जाहीर केले.
सकाळी नियोजित वेळेत महासभा सुरू झाली. या वेळी जेमतेम १२ ते १३ नगरसेवक उपस्थित होते, तर उपायुक्त समाधान सोळंके प्रशासन अधिकारी म्हणून उपस्थित होते. नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन महापौर देशमुख यांनी कोरमअभावी ही सभा पुढे ढकलण्यात येत असल्याचे जाहीर केले. भारिप-बमसंचे गटनेते गजानन गवई यांनी सभेचा दिनांक निश्चित करणे आणि सभा स्थगित करणे, असा प्रकार सत्ताधारी गटाकडून वारंवार होत आहे. ही बाब अधिनियमांची पायमल्ली करणारी आहे. सत्ताधाऱ्यांनी नियोजन करून सभा बोलवावी. जेणेकरून नियमांची पायमल्ली होणार नाही तसेच नगरसेवकांचा वेळही वाचेल. परंतु, या सुरू असलेल्या प्रकाराचा निषेधही त्यांनी केला.