आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री, महापौरांनी केली कापशीची पाहणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरापासून१४ किलोमीटरवरील कापशी तलाव परिसरात पर्यटन स्थळ निर्माण करण्यासाठी शासनाकडून एक कोटी ६५ लाखांंचा निधी मिळाला आहे. याअनुषंगानेच कापशी तलाव परिसराच्या मोजणीचे काम सुरू आहे. जानेवारीला पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, महापौर उज्ज्वला देशमुख यांनी कापशी तलाव परिसराची पाहणी केली.
कापशी तलावाची मोजणी पूर्ण झाल्यानंतर आवारभिंत बांधणार असून, उद्यान तयार केले जाणार आहे. यात मुलांसाठी खेळणी, नौका विहार आदी सुविधा उपलब्ध करणार आहेत. याअनुषंगाने ही पाहणी केली. या निधीतून विकासकामे झाल्यानंतर निधीनुसार विकासकामे केली जाणार आहे. या वेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मोजणीबाबत माहिती घेतली. या वेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, आयुक्त अजय लहाने, शहर अभियंता अजय गुजर, कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे, अभियंता राजेश श्रीवास्तव उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...