आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Guardian Minister Ranjit Patil Give Check To Victim's Family

'त्या' कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान, सरकारतर्फे कुटुंबीयांना मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सानुग्रह मदतीचा धनादेश देतांना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील )
अकोला- जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील शिगोली गावात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेतील मृतकांच्या नातेवाइकांची पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी १९ सप्टेंबर रोजी भेट घेऊन सांत्वन केले.
दोन दिवसांपूर्वी वीज अंगावर पडून श्रीकृष्ण बोर्डे आणि सचिन बोर्डे या दोन चुलत भावांचा मृत्यू झाला होता. या दुखद घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शिगोली गावात बोर्डे कुटुंबीयांची भेट घेतली. सरकारतर्फे दोन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत पालकमंत्री पाटील यांनी या वेळी केली, तर या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींचीसुद्धा भेट घटली.
या वेळी त्यांचेसोबत माजी आमदार नारायण गव्हाणकर यांचेसह तहसीलदार समाधान सोळंके महसूलचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी शेतकरी आत्महत्या प्रकरणांचीसुद्धा माहिती पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. शेतकरी आत्महत्यांचे प्रस्ताव तातडीने निकाली लावण्याचे आवाहन यानिमित्ताने पालकमंत्र्यांनी केले आहे.