आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावणे दाेन काेटींचा गुटखा नष्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्ह्यातप्रतिबंधित जप्त केलेला गुटखा शनिवारी अन्न अाैषध प्रशासनाने नष्ट केला. नष्ट केलेल्या गुटख्याची किंमत काेटी ८७ लाख रुपये हाेती. 
गुटखा बंदीनंतरही सर्वाधिक गुटखा मध्यप्रदेशातून जिल्ह्यात अाणला जाताे. काही वर्षांपूर्वी अन्न अाैषध प्रशासनाच्या अायुक्तांनी पाेलिस दलाला गुटखा जप्त करण्याच्या कारवाया करण्यासाठी मदतीचे अावाहन केले हाेते. या अावाहनाला प्रतिसाद देत पाेलिसांनी कारयावांसाठी कंबर कसली. त्यामुळे जिल्ह्यात बहुतांश कारवाया या पाेलिसांकडूनच झाल्या. अाताही सर्वाधिक कारवाया पाेलिसांकडूनच हाेतात. पुढील कारवाईसाठी नंतर प्रकरण अन्न अाैषध प्रशासनाकडे वर्ग करण्यात येते. केवळ मनुष्य बळ इतर कामांमुळे वेळ मिळत नसल्याने अाम्ही कारवाया करु शकत नाही, अशी वेळ मारुन नेण्याचे उत्तर अन्न अाैषध प्रशासनाचे काही अधिकारी देतात. अन्न अाैषध प्रशासनाने दीड वर्षात १३५ कारवायांमध्ये काेटी ८७ लाख ४२ हजार ६७१ रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाया वाशीम अकाेला जिल्ह्यात केल्या. या सर्व कारवायांबाबत दस्तावेज तयार केले. हा गुटखा जप्त केल्यानंतर नष्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. पंचनामा केल्यानंतर खडकी परिसरात गुटखा नष्ट केला. यावेळी निरीक्षक नितीन नवलकार, शरद काेते, राजेश यादव, प्रशांत अजिंक्यकर अादी उपस्थित हाेते. 
बातम्या आणखी आहेत...