आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यायामशाळेत साहित्य अफरातफर, माजी ग्रामपंचायत सदस्यांसह नागरिकांनी केले कलेक्ट्रेटवर उपोषण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शिवरयेथील आश्रमशाळेच्या साहित्याची अफरातफर करणाऱ्यांविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी माजी सदस्य राहुल सिरसाट त्यांच्या पाच सहकाऱ्यांनी जिल्हािधकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. मनपा हद्दीत समाविष्ट होण्यापूर्वी शिवर येथे व्यायामशाळा बांधण्यात आली. या व्यायामशाळेला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत साहित्य पुरविण्यात आले होते. परंतु हे साहित्य माजी सरपंचांच्या सांगण्यावरुन व्यायामशाळेच्या सभागृहात आणता ते त्यांच्याच ताब्यात ठेवले गेले, असा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. सध्या हे साहित्य गंजू लागले असून त्याचा खरा उपयोग व्हावा, यासाठी संबंधितांनी वारंवार यंत्रणेला लिहिले. परंतु संबंधित अधिकाऱ्यांमार्फत अद्यापही कोणताच निर्णय घेतला गेला नाही. 

त्यामुळे माजी सदस्य राहुल सिरसाट त्यांचे सहकारी प्रशांत वैराळे, धीरज झापर्डे, विठ्ठल वलीवकर, दीपक नांदोकार, शेख अन्सार शेख अफसर यांनी जिल्हा कचेरीसमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. आंदोलनादरम्यान जिल्हािधकारी महोदयांना निवेदनही सोपविण्यात आले. 

पालकमंत्री,डीएसओंनाही निवेदन : यानिवेदनाच्या प्रती पालकमंत्री प्रा. डॉ. रणजीत पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक, आणि शिवर आंदोलनस्थळ ज्या हद्दीत येते, त्या एमआयडीसी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांनाही देण्यात आले आहे.