आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hail Storm Hit Vidarbh, Houses Collapsed, Electricity Supply Cut

गारपीटीसह वादळी वाऱ्याने नुकसान; घर कोसळले, वीज पुरवठाही खंडित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यात वादळी वारे आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यात शिरजगाव बंड येथे घर कोसळले. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, उमरखेड येथे २० ते २२ तासापासून वीज पुरवठा खंडीत झाला.
उमरखेड तालुक्यातील अनेक गावांना शनिवारी वादळी वाऱ्यासह पाऊस गारा पडल्या, त्यामध्ये पीकांचे मोठे नुकसान झाले.

चांदूरबाजार तालुक्यात तुफान गारपीट झाली. अचलपूर तालुक्यात तासभर मुसळधार पाऊस झाला. गारपिटीमुळे अनेक ठिकाणी पीक नेस्तनाबूत झाले. शिरजगाव बंड येथे एक घर कोसळले असून, २२ मेंढ्या जखमी झाल्या. चांदूरबाजार तालुक्याला सतत दुसऱ्या दिवशी गारपिटीने तडाखा दिला. अचलपूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे प्रचंड हानी झाली. मोर्शी तालुक्यातही तुरळक पावसाने हजेरी लावली.

मराठवाड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. बीडमध्ये काही वेळ गारा पडल्या तर लातूर शहर आणि परिसरात रात्री विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. उस्मानाबादेतही या पावसाने हजेरी लावली.

विदर्भात उद्या सोमवार, २९ ला काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह पाऊस येईल, असा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. दक्षिण कर्नाटकाचा आतील भाग ते दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेशावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा दक्षिण मध्य महाराष्ट्र ते पश्चिम मध्य प्रदेशावरून गेल्याने विदर्भात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. रविवारी, ढगाळ वातावरण होते. विदर्भात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पुसद येथे सें.मी. उमरखेड सेलू येथे सें. मी. देवळी येथे सें. मी. पावसाची नोंद झाली.