आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नको असेेल ते द्या’ चे हँगरही नेले; माणुसकीच्या भिंतीची अशीही थट्टा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेहकर - मेहकरात सुरू केलेल्या माणुसकीची भिंत या उपक्रमाला काही महिन्याच्या कालावधीतच तिलांजली मिळाली. अज्ञात व्यक्तीने त्या भिंतीवरील कपडे लटकविण्याचे हँगरच काढून नेल्याने माणुसकीची भिंतीतून शहराचीच माणुसकी हरवल्याचे दिसते. 
 
आवश्यकता नसलेल्या वस्तू ठेवायच्या, ज्यांना त्यांची गरज आहे, त्यांनी घेऊन जायच्या. यासाठी मेहकर शहरातील सुज्ञ नागरिकांनी गत डिसेंबर-जानेवारी दरम्यान नगर पालिका शेजारील स्वातंत्र्य मैदानाजवळ माणुसकीची भिंत तयार केली. त्या भिंतीवर हँगर लावत आपल्याला जे कपडे नकाे आहेत. ते या भिंतीवरील हँगरला लटकावून ठेवावे ज्यांना त्या कपड्यांची गरज आहे अशा गरजवंतांना त्या भिंतीवरील हवे ते कपडे घेवुन जावे असा उपक्रम सुरु केला. असे असतांना या उपक्रमाला सुरुवातीचे दोन तीन महिने चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र काही दिवसानंतर या उपक्रमाकडे शहरातील सुज्ञ नागरिकांनी पाठ फिरविल्याने अज्ञात नागरिकांनी या भिंतीवरील लावलेले हँगरच काढुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...