आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे अामिष दाखवून अत्याचार, खदान पोलिस ठाण्यात युवकावर गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - लग्नाचे अामिष दाखवून युवकाने प्रेयसीवर अत्याचार केल्याप्रकरणी शुक्रवारी खदान पाेलिस ठाण्यात संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला.
पनवेल तालुक्यातील एक युवती अकाेल्यात अभियांत्रिकी विद्यालयात शिकण्यासाठी अाली. २०११ मध्ये महाविद्यालयात तिची अजय गाेपालदास बजाज या विद्यार्थ्याशी अाेळख झाली. अाेळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्याने लग्नाचे अामिष दाखवून तिच्याशी सहकार नगरातील एका घरात संबंध प्रस्थापित केले. मात्र, नंतर त्याने लग्नाला नकार दिला. त्यामुळे युवतीने मुंबई येथे पाेलिसांत तक्रार दिली. मात्र, घटनास्थळ अकाेल्यातील खदान पाेलिस ठाण्यांतर्गत असल्याने मुंबई पाेलिसांनी तक्रार अकोला पाेलिसांकडे हस्तांतरित केली. त्यानुसार पाेलिसांनी अजय गाेपालदास बजाजविरुद्ध भादंविचे कलम ३७६, ४१७ अन्वये गुन्हा दाखल केला.
विविध ठिकाणी केला अत्याचार
काही दिवसानंतर युवक नाेकरीनिमित्त पुणे येथे स्थलांतरित झाला. त्यानंतर युवतीही नाेकरीनिमित्त पुण्यात गेली. तेथेही दाेघांमध्ये संबंध प्रस्थापित झाले. मात्र, अाता युवतीने तक्रार दिल्याने युवकाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात अाला.
बातम्या आणखी आहेत...