आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्तव्याव्यतिरिक्त अन्य कामे; पोलिस कर्मचाऱ्यांत खदखद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शिक्षकांप्रमाणे पोलिसांवर इतर स्वरुपाची म्हणजे सेवाबाह्य कामे लादल्या जात असल्यामुळे आमचा समाजात धाक राहिला नाही. त्याचे रुपांतर पोलिसांवरील हल्ल्यात होत आहे. पोलिस मित्र संकल्पनेचाही प्रत्यक्षात फायदा होत नसल्याचे कबुली स्वत: पोलिसच देत आहेत. शिक्षकांसारखे पोलिसबाह्य कर्तव्याव्यतिरिक्त कामांचे ओझे आमच्यावर का लादता, अशी दबक्या आवाजातील खदखद पोलिस व्यक्त करत आहेत.

पोलिसांवरील हल्ले त्यांचे प्रश्न याबाबत जाणून घेतले असता ते म्हणाले की, ३०- ३५ वर्षापूर्वी भिवंडीत जातीय दंगल झाली, तेव्हापासून शांतता समितीची संकल्पना समोर आली. त्यांचे परिणामही चांगले मिळाले, मात्र तत्कालीन परिस्थिती आज राहिली नाही. प्रत्येक शहरामध्ये ५०० च्या वर पोलिस मित्र असताना गुन्हेगारी कमी झाली नाही. तसेच सेवाबाह्य कामे करताना पोलिसांचे मूळ काम बाजूला राहत असून, गुन्हेगारीचा आकडा मात्र वाढत आहे. आता पोलिस मित्र संकल्पनेसोबतच शालेय पोलिस बाल मित्राची संकल्पना राबवल्या जाणार आहे. त्याचे टार्गेट पोलिसांना लवकरच दिल्या जाणार आहे. हे बालमित्र तपासात किंवा गुन्हेगारी कमी होण्यासाठी कोणती भूमिका बजावणार आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस मित्रांनी गुन्हेगारी रोखण्यात किंवा तपासात आजपर्यंत कोणते काम केले किती गुप्त वार्ता पोलिसांना दिल्या असा प्रश्न निर्माण होत आहे. शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे, आत्महत्येपासून परावृत्त करणे, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलींचे लग्न लावून देणे ही जबाबदारी स्वतत्र यंत्रणेची असताना ती पोलिसांवर लादल्या जात असल्याचे शल्य पोलिसांना बोचत आहे. पोलिस दलाची संख्या अपुरी असताना त्यांना दिल्या जाणाऱ्या कर्तव्याव्यतिरिक्त अन्य कामांचा त्यांच्यावर ताण पडत आहे. पोलिस त्यांच्या कामापासून दूर जात असल्यामुळे गुन्हेगारांमधील पोलिसांबाबतची भीती कमी होत अाहे, असे अनुभव त्यांनी कथन केले. कम्युनिटी पोलिसींगचा परिणाम गुन्ह्यांच्या तपासावर होत आहे तसेच गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, याचे उत्तर पोलिस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव देतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिसांच्यामते हल्ल्याची कारणे : प्रमाणापेक्षाजास्त कम्युनिटी पोलिसिंग, पोलिस मित्र संकल्पनेचा अतिरेक, जनतेची पोलिसांना अत्यंत गरज आहे हे प्रत्येक कार्यक्रमातून दाखवले गेले. जातीय सलोखा कार्यक्रमाचा अतिरेक, पोलिसांना प्रत्येक कार्यक्रमात जनतेने सहकार्य करावे ही विनवणी, जी कामे पोलिसांची नाहीत ती पोलिसांनी करणे, शाळाबाह्य मुले शोधणे, ट्रीपल पोलिओ डोस कार्यक्रम राबवणे, बेटी बचावो कार्यक्रम घेणे या कार्यक्रमाचा पोलिसांशी प्रत्यक्ष संबंध नाही.
कार्यक्रमासाठी पोलिसांनी पैसे आणावेत कुठून? : कम्युनिटीपोलिसींगच्या कार्यक्रमासाठी शासनाकडून निधी दिला जातो काय? पोलिस अधिकारी कर्मचारी आपापल्या स्तरावर काही लोकांकडून भाऊ, दादा म्हणून त्यांना विनंती करून निधी जमा करतात. मुळात निधी देणारे कोण हे माहिती असतानाही, आदेश बजावण्यासाठी नाक मुरडून सर्व करावे लागत आहे.असे जर पोलिसांच्या हातून घडत असेल, तर एखादी कारवाई करण्यास त्याचा हात कसा धजावेल असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
आयजी साहेब, या प्रश्नांची उत्तरे द्याच!
>किती पोलिस मित्रांनी अतुलनीय कामगिरी बजावली?
>पोलिस मित्र, शांतता समिती सदस्यांनी किती प्रकरणे मिटवली?
>किती अवैध धंद्याची गोपनीय माहिती दिली?
>अशा कार्यक्रमांसाठी निधीची तरतूद आहे काय?
>पीएसआयला पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा किती पोलिस मित्र हजर होते?
बातम्या आणखी आहेत...