आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडधान्य साठेबाजी; अाज हाेणार सुनावणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- कडधान्याचा विनापरवाना साठा केल्याप्रकरणी गुुुरुवारी िजल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष सुनावणी हाेणार अाहे. साठा केल्याप्रकरणी संबंधितांना पुरवठा विभागाला स्पष्टीकरण सादर करण्यास सांगण्यात आले होते. पुरवठा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या जुलैत वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. तपासणीनंतर कोटी ८२ लाख ३७ हजार ७५० रुपयांचा हजार ४२१ क्विंटल कडधान्याचा साठा जप्त केला हाेता.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये जिल्हा पुरवठा विभाग महसूल प्रशासनाने गोदामांच्या तपासणीची मोहीम राबवली हाेती. त्यामध्ये कडधान्याचा विनापरवाना साठा करण्यात अाल्याची बाब उजेडात अाली हाेती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पंचनामा करून कडधान्य जप्त केले हाेते.

हेकरणार स्पष्टीकरण सादर : १)एमआयडीसीमधील पाटणी कोल्ड स्टोअरेज फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ठेवण्यात आलेला ७० लाख ९३ हजारांचा नियमबाह्य साठा जप्त करून सील करण्यात आला. यामध्ये तूर ३३८ क्विंटल, हरभरा ३९२.५ क्विंटल, मूग १३० क्विंटल अशा ८६० क्विंटल धान्याचा समावेश हाेता. अाता नेमका हा साठा काेणाचा हाेता, काेठून अाणण्यात अाला हाेता. अाता स्पष्टीकरण सादर झाल्यानंतर सुनावणीअंती प्रशासन काय कार्यवाही करणार, याकडे सर्वांचे लागले अाहे.

२) महसूल अधिकाऱ्यांनी येवता रोडवरील एमआयडीसी क्रमांक मधील संदीप कचोलिया यांच्या मालकीच्या एम. के. कोल्ड स्टोरेजमध्येही अधिकाऱ्यांनी छापा टाकला हाेता. तपासणीनंतर विनापरवाना साठवलेला ८५२ क्विंटल ८० किलो हरभरा आणि ७०७ क्विंटल ६० किलो मूग जप्त जप्त करण्यात आला. हरभऱ्याची किंमत ७२ लाख ५० हजार ५०० तर मुगाची किंमत ३८ लाख ९४ हजार रुपये असल्याचे जप्ती पंचनाम्यात नमूद केले हाेते.
बातम्या आणखी आहेत...