आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काटेपूर्णा, वान प्रकल्पाचे दरवाजे उघडले, ४० गावांना दिला सतर्कतेचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - गतकाही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे प्रकल्प तुडंब भरल्याने जिल्ह्यातील नदी काठच्या ४० गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात अाला अाहे.
यंदा जून महिन्याच्या दुसऱ्या अाठवड्यापासून शहरात पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरु केली. जुलै महिन्यातही दमदार पाऊस झाला. १० अाॅगस्ट नंतर मात्र पावसाने दडी मारली. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या अाठवठ्यात पुन्हा पाऊस सुरु झाला.

दरम्यान तीन-चार दिवसांपसून सुरु परतीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झाेडपले. जिल्हयातील दाेन प्रकल्प १०० टक्के, तर दाेन प्रकल्प ९० टक्क्यांपेक्षा जास्त भरले अाहेत. इतर प्रकल्पही तुंडब भरल्याने पाणी साेडण्यात अाले. परिणाम नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली अाहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने साेमवारी जिल्ह्यातील ३७ गावांना सतर्कतेचा इशारा दिला अाहे. प्रशासनाने सर्वच यंत्रणांना सावध राहण्यास सांगितले अाहे.

विद्यार्थ्यांचीमजा, पालकांची तारांबळ : साेमवारीपहाटे ते ५.३० या दरम्यान शहरात तुफान पाऊस झाला. शहरात गाैरक्षण राेड, अशाेक वाटिका ते सरकारी बगिचा अािण जुने शहरातील श्रीवास्तव चाैक ते डाॅ. बाबासाहेब अांबेडकर मैदान चाैकापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण सुरु अाहे. त्यानंतही पाऊस सुरुच हाेता. पावसामुळे सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी मात्र पाऊस साजरा केला, मात्र त्यांच्या पालकांची चांगलीच तारांबळ उडाली.
जिल्ह्यातीलसर्वात मोठ्या असलेल्या काटेपूर्णा, वान या प्रकल्पासोबतच पोपटखेडा प्रकल्पाचे प्रत्येकी दोन दरवाजे उघडले आहेत. काटेपूर्णातून प्रति सेंकद २६.३३, वानमधून २७,१२ तर पोपटखेडा प्रकल्पातून ६.६८ क्युमेक्स (घनमीटर) पाणी सोडणे सुरू आहे. वृत्त लिहेपर्यंत दोन दशलक्ष घनमीटर पाणी वाहून गेले. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावातील नागरिकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.

परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळेच सप्टेंबर अखेरपर्यंत केवळ उमा निर्गुणा प्रकल्प ओव्हर फ्लो झाले होते, तर मोठे, मध्यम लघू प्रकल्पामध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा उपलब्ध झाला होता. त्यामुळे १०० टक्के जलसाठा उपलब्ध झाला नव्हता. मात्र, सप्टेंबरच्या शेवटच्या दोन दिवसांत एक ऑक्टोबरपासून परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोडपले. अकोल्यासह वाशीम जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने काटेपूर्णा प्रकल्प १०० टक्के भरला. त्यामुळे काटेपूर्णा, वान पोपटखेडा प्रकल्पाचे प्रत्येकी दोन दरवाजे उघडावे लागले आहे.

काटेपूर्णा प्रकल्पाचे दहा पैकी दोन दरवाजे सकाळी नऊ वाजून ४० मिनिटांनी १५ सेंटीमिटरने उघडण्यात आले. यातून प्रति सेंकद २६.३३ घनमिटर, वान प्रकल्पाचेही सकाळी सात वाजता दोन दरवाजे १५ सेंटीमीटरने उघडण्यात आले. यातून प्रति सेंकद २७.१२ तर पोपटखेडा प्रकल्पाचे दरवाजे सकाळी आठ वाजता पाच सेंटीमीटरने उघडले. यातून प्रतिसेंकद ६.६८ घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वृत्त लिहेपर्यंत जवळपास दोन दशलक्ष घनमीटर पाणी सोडले असून, पाऊस सुरूच राहिल्यास दरवाजे उघडे ठेवण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. परिणामी जिल्हा प्रशासनाने काटेपूर्णा,वान, पूर्णा आदी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तीनवर्षानंतर उघडले दरवाजे
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पाचे तीन वर्षानंतर दरवाजे उघडण्यात आले. यापूर्वी २०१० ला त्यानंतर २०१३ ला दहाही दरवाजे उघडण्यात आले होते. या दोन्ही वेळी जवळपास २०० दशलक्ष घनमीटर पाणी सोडले होते. त्यामुळे २०१३ नंतर आता यावर्षी दोन दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे दर तीन वर्षांनी प्रकल्प ओव्हर फ्लो होतो, असे मत पाटबंधारे सूत्रांनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...