आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला जिल्ह्यात दमदार पाऊस, बळीराजा सुखावला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गुरुवारी दुपारी जिल्हाभर दमदार पाऊस झाला. या पावसाचा फायदा सोयाबीनसह कपाशी तूर पिकाला होणार असल्याने बळीराजा सुखावला. १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतक ऱ्यांच्या तोडांशी आलेला घास हिसकल्या जातो की काय अशी अवस्था निर्माण झाली होती. तसेच ऐन भरात आलेली पिके करपू लागली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 
 
१५ दिवसांपूर्वी बऱ्यापैकी जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडला होता. मात्र तो पाऊस पुरेसा नव्हता. त्यामुळे वातावरणात उकाडा निर्माण झाला होता. सोयाबीनचे पिक आता शेंगामध्ये असून, दाणा टपोरा होण्यास हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. गुरुवारी सार्वत्रिक पाऊस झाल्याने कपाशी, तूर पिकासाठी लाभदायक ठरला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७५ टक्के पाऊस झाला होता. सध्याच्या हवामानाच्या अंदाजावरून पावसाची तूट भरून निघण्याची शक्यता आहे. गुरुवारी झालेल्या पावसाने नदी-नाल्यांना पाहिजे त्या प्रमाणात पूर आल्याने जलसाठ्यात किंचितशीच वाढ झाली आहे. 

उडिद, मुगाची कसर सोयाबीन काढणार 
उडिद-मुग फुलोऱ्यात असताना पावसाने दडी मारली होती. त्याचा परिणाम मुग-उडिदाच्या उत्पादनावर झाला होता. मुगाचे उत्पादन कमी झाल्याने आता हातचे आलेले सोयाबीनचे पिकही जाण्याच्या मार्गावर होतो. मात्र आता शेंगामध्ये असलेले सोयाबीनसाठी हा पाऊस फायद्याचा ठरणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...