आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाणा परिसरामध्ये दमदार पावसाची हजेरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - मागील तीन दिवसापासून दररोज शहरात पाऊस हजेरी लावत आहे. दरम्यान मंगळवारी रात्री शहरासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जवळपास एक ते दिड तास धो धो पाऊस पडला आहे. तर आज दुपारी तीन वाजेपासून रिमझिम स्वरुपात पावसाने सुरूवात करून दिली होती. तसेच मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे सुध्दा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर गेला आहे. उशिरा का होईना पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 
 
प्रत्येकाला दमदार पावसाची आतुरता लागली होती. मागील तीन दिवसापासून पाऊस शहर परिसरात हजेरी लावत आहे. दरम्यान काल रात्री अकरा वाजता पहाटे तीन वाजेच्या सुमारास पावसाने शहर परिसरात जोरदार सुरूवात करून दिली. एक ते दिड तास धो धो पाऊस पडला. तर आज रोहिणखेड येथे दुपारचे सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे कोलवड येथील पैनगंगेला पूर गेला आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात काही अंशी जलसाठ्यात वाढ झाली आहे. तर दमदार पावसामुळे रोहिणखेड परिसरात देखील नदी नाल्यांना पूर गेला आहेे. उशिरा का होईना, पावसाने दमदार सुरूवात करून दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तर आज संध्याकाळ पर्यत ढगाळ वातावरण होते. 
 
झालेला पाऊस 
मंगळवारी जिल्ह्यात २११.२ मि.मि. पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी १६.२ आहे. त्यामध्ये बुलडाणा ३१, चिखली २८, देऊळगावराजा ६३, सिंदखेडराजा ९, लोणार १७, मेहकर २५, खामगाव ३०.२, शेगाव २, मोताळा संग्रामपूर तालुक्यात ५. मि.मि. पाऊस झाला आहे. तर जळगाव जामोद, नांदुरा मलकापूर ही तालुके निरंक आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...