आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झाला ‘कहर’, जिल्ह्यात गुरुवार, शुक्रवार अतिवृष्टीचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसामुळे ग्राम पंचायतीच्या मालकीची कोसळलेली इमारत. - Divya Marathi
पावसामुळे ग्राम पंचायतीच्या मालकीची कोसळलेली इमारत.
वाशीम- सतत सुरू असलेल्या पावसामुळे या भागातील जलाशय भरले आहेत. एकबुर्जी तलाव आेव्हरफ्लो झाला तर पैनगंगा नदीवरील बॅरेजचे दरवाजे उघडण्यात आले. मध्यम प्रकल्पातही चांगला साठा झालेला आहे. पाणीटंचाईचे संकट आता टळले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

मंगळवारपासूनच जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरुपाचा पाऊस होत आहे. या पावसामुळे पैनगंगेवरील अडगाव, गणेशपूर, कोकलगाव, ढिल्ली, उकळी, जुमडा, राजगाव, टणका, जयपूर सोनगव्हाण बॅरेज तुडुंब भरले असून, संभाव्य हानी टाळण्यासाठी बॅरेजेसचे सर्व दरवाजे मंगळवारी उघडले होते. रब्बी हंगामात शेकडो हेक्टर जमीन सिंचनाखाली येण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा यामुळे पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, बॅरेजच्या परिसरामध्ये नागरिकांनी येऊ नये, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. एकबुर्जी मध्यम प्रकल्पासह एकूण ३३ प्रकल्प मंगळवारी ‘ओव्हर फ्लो’ झाले. जिल्ह्यात सर्व तालुक्यात बुधवारीही पावसाची रिपरिप सुरू होती. हा आठवडा पाऊस राहण्याची शक्यता हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

आणिरोजी अतिवृष्टीचा इशारा : संततधारपाऊस आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. आणि ऑगस्ट रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावे तसेच धरणाच्या संरक्षित क्षेत्रामध्ये नागरिकांनी जाऊ नये, असा इशाराही देण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने सर्वत्र पाऊस होत आहे, असेही म्हटले आहे.

किन्हीराजा-मालेगावरस्त्याची झाली चाळण
नागपूर-औरंगाबादमहामार्गावर किन्हीराजा ते मालेगाव २३ किलोमिटरचे अंतर पार करताना महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून महामार्गाची अक्षरश: चाळणी झालेली आहे. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या पावसाळा असल्याने तर वाहनचालकांची तारांबळ होत आहे. थोडासा अंदाज चुकला तरी वाहनांचे अपघात होत आहेत. हे रस्ते गेल्या काही महिन्यांपासून नादुरुस्त आहेत. महामार्गावर रहदारी बरीच असल्याने रस्ते अधिक काळ टिकत नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घातले असते तर लोकांना त्रास झाला नसता परंतु ही बाब ध्यानात घेतली नाही. त्यामुळे अपघातांची संख्या वाढलेली दिसत आहे.

संततधार पावसामुळे खरीप पिके धोक्यात
मानोरा पाच सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या भागातील खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. अनेक शेतांमध्ये पाणी साचले असल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. शेतातील पाण्याचा निचरा झाल्याने पिकांवर बुरशीजन्य रोग, अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे. अतिवृष्टीमुळे शेतामध्ये तण वाढले आहे. २८ जुलैपर्यंत तालुक्यात ५५,२०२ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली.

ग्रामपंचायतीच्या मालकीची इमारत कोसळली : मेडशी येथील वॉर्ड क्रमांक मध्ये ग्राम पंचायतीच्या मालकीची इमारत कोसळली. सुदैवाने जिवितहानी टळली. जीर्ण झालेल्या इमारतीकडे ग्राम पंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शेवटी ती पडली.ग्राम पंचायतच्या वतीने ही वास्तू भाडेतत्त्वावर देण्यात येत होती. सिनेमागृह म्हणून तिचा वापर होत असे. तसेच एका व्यावसायिकाला बरीच वर्ष ती वापरासाठी देण्यात आली होती. त्या इमारतीची देखभाल तसेच डागडुजी करण्यात आल्याने पावसाच्या भराने ती पडली. ही इमारत ज्ञानेश्वर मुंदे यांच्या भिंतीवर कोसळली. परंतु त्यावेळी घटनास्थळी कोणीही नसल्याने प्राणहानी झाली नाही. ही वास्तू पाडण्याची मागणी आहे.

दोन दिवसांपासून संततधार पाऊस
मालेगाव तालुक्यात मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वदूर पाऊस असल्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे. मागील वर्षी तालुक्यात कमी पाऊस झाला होता. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले होते. यावर्षी सुरुवातीपासून खरिपाच्या पिकासाठी योग्य पाऊस होत आहे.

गव्हा गावातून जाणाऱ्या नाल्याला आला पूर
मानोरामौजे गव्हा येथून वाहणाऱ्या नाल्याला पूर आला. गावाच्या वरच्या भागात असणाऱ्या आसोला खुर्द गव्हा तलावामुळे हा नाला धाे-धो वाहत आहे. तसेच लघुसिंचन विभाग, ग्रा. पं. प्रशासनाच्या वतीने नाल्याच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गव्हा गावाच्या मधून मोठा नाला वाहतो. सदर नाल्याला आठ दिवसांपासून संततधार पडलेल्या पावसामुळे पूर आला. आसोला गव्हा तलाव १०० टक्के भरल्यामुळे नाल्याला पूर आला.
बातम्या आणखी आहेत...