आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दमदार पाऊस; २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मध्य प्रदेशातील कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकल्यास येत्या २४ तासांत जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा बाळापूर या तालुक्यांत ऑगस्ट रोजी दुपारी पासून तीन तास संततधार पाऊस झाला.
जिल्ह्यात ऑगस्ट ते ऑगस्टदरम्यान, दमदार पाऊस झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ऑगस्टला हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार ऑगस्टला दुपारी वाजता दमदार पाऊस झाला. शनिवारी अकोला शहरासह बोरगावमंजू, घुसर, खडकी, कौलखेड या भागांत पाऊस झाला. याशिवाय अकोट, तेल्हारा, बाळापूर तालुक्यात चांगला पाऊस झाल्याची नोंद आहे.

जलपातळीतवाढ : अमरावतीजिल्ह्यातून येणाऱ्या नद्यांचे पाणी वाढत असल्याने जिल्ह्यातील नद्यांना पूर येत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ तलाठी, मंडळअधिकाऱ्यांसह तहसीलदारांना माहिती देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.