आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन् त्या ४० कुटुंबीयांना मिळणार जगण्याचे बळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यात एकापाठाेपाठ "एक शेतकरी अात्महत्येचे सत्र' सुरूच अाहे. घरातील कर्त्या पुरुषाने अात्महत्या केल्यानंतर परिवाराचे हाल हाेतात. त्यामुळे शेतकरी अात्महत्याग्रस्त कुटुंबीयांना पुन्हा जगण्याचं बळ देण्यासाठी जिल्हा परिषदेचा वन महसूल विभाग सरसावला अाहे. त्यांनी दिलेल्या अार्थिक मदतीतून वेगवेगळ्या ठिकाणच्या ४० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांना रोजगार उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. अात्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी ‘दिव्य मराठी’ने महाअभियान राबवले अाहे.
जिल्ह्यात २००१ ते २०१५ या १५ वर्षांमध्ये १,६८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे शेतकरी अात्महत्या थांबाव्यात यासाठी गरजू शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे अावाहनही करण्यात अाले हाेते. या अावाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी अात्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांसाठी मदतीचा हात दिला. पोळ्याच्या दिवशी ज्येष्ठ कवी प्रा. डॉ. िवठ्ठल वाघ यांनी पाच शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी पाच हजारांची मदत दिली. एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना सरकार लाख रुपये देते. पण, या मदतीतून त्या कुटुंबाला तात्पुरती आर्थिक मदत जरी होत असली, तरी भविष्यातील समस्या मात्र कायम राहतात. ‘दिव्य मराठी’ने सुरू केलेल्या या अभियानाला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार संतोष शिंदे, नायब तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, निवासी नायब तहसीलदार पूजा माटोडे यांनी कृतीची जाेड दिली. यांच्या मदतीने गेल्या महिन्यात अकोला तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा मेळावा घेण्यात अाला. त्या कुटुंबांतील व्यक्तींनी गरजेप्रमाणे त्यांच्या गरजांची माहिती प्रशासनाला दिली. यामध्ये मुलामुलींनी फी नाही म्हणून शिक्षण अपुरे सोडल्याचे सांगितले, तर महिलांनी आमच्याकडे रोजगाराचे साधन नसल्याने कुटुंबांवर उपासमारी अाल्याची व्यथा मांडली. त्यानंतर दैनिक ‘दिव्य मराठी’ने ‘पैसे नको, वस्तू द्या’, असे अावाहन केले. या अावाहनाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत अाहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी आपणही काहीतरी केले पाहिजे या भावनेने अनेक दानशूर व्यक्ती समोर येत आहेत.
महसूल कर्मचारी, वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी तर आपले एक दिवसाचे वेतनसुद्धा दिलासा अभियानासाठी जमा केले आहे.

असे झाले नियोजन
गावनिहाय गरजूंची यादी तयार केली आहे. एका गावात चार ते पाच प्रकारचे रोजगार चालू शकतील यादृष्टीने वस्तूंचे वाटप केले जाणार आहे. यामध्ये पिठाची गिरणी, पापड उपकरण, दुधाचा व्यवसाय, शिलाई मशीन, मिरची हळद पावडर तयार करण्याचे यंत्र दिले जाईल.

यांनी दिली मदत
शहरातील रतनलाल प्लॉट येथील प्रा. अनिल फाळके तापडियानगरातील संकल्प प्रतिष्ठान सिव्हिल लाइनमधील श्री. दत्त मेडिकल यांनी अात्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेत अार्थिक मदत केली अाहे.

मुंबईतूनही मदत
^जिल्ह्यात सुरू असलेल्या "दिलासा मिशन'ची माहिती मुंबईत पोहोचली अाहे. एका बैठकीसाठी मुंबईला गेलो असता काही दानशूर व्यक्तींनी ५० लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.'' जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी.

लवकरच सोहळा
^शेतकरी कुटुंबांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शनात नियोजन सुरू आहे. पुढील आठवड्यात साहित्य वितरण सोहळा घेण्यात येईल. नागरिकांनी मदत करावी'' प्रा.संजय खडसे, एसडीओ.

वन विभागाचा पुढाकार
^वनविभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एका दिवसाचे वेतन जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम दीड लाखांच्या घरात जाते. यातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या पुर्नवसनासाठी दिली जाईल.'' ए.आर. वायाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी